Rajasthan Train Derailed: राजस्थानात सुपरफास्ट रेल्वेचा भीषण अपघात; 4 डबे रुळावरून घसरले आणि....

Rajasthan Train Derailed : तुमच्या कुटुंबातून किंवा ओळखीतील कोणी या रेल्वेनं प्रवास करत होतं का? पाहा आताच्या क्षणाला घटनास्थळी नेमकी काय परिस्थिती...   

सायली पाटील | Updated: Mar 18, 2024, 09:07 AM IST
Rajasthan Train Derailed: राजस्थानात सुपरफास्ट रेल्वेचा भीषण अपघात; 4 डबे रुळावरून घसरले आणि....  title=
Rajasthan Train Derailed 4 Coaches of Superfast Train Derail in ajmer latest update

Rajasthan Train Derailed : भारतीय रेल्वेतील बचाव पथकं आणि संपूर्ण रेल्वे यंत्रणेला एका भीषण अपघातामुळं जबर हादरा बसला आहे. साबरमती (अहमदाबाद) येथून आग्रा अर्थात गुजरातहून उत्तर प्रदेशच्या दिशेनं जाणाऱ्या सुपरफास्ट ट्रेनचे चार डबे रुळावरून घसरल्यामुळं राजस्थानमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. राजस्थानातील अजमेर येथे हा भीषण अपघात झाला असून, भरधाव वेगात असणाऱ्या रेल्वेनं मालगाडीला धडक दिल्यामुळं हा अपघात घडल्याचं प्राथमिक माहितीतून कळत आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार या अपघातामध्ये रेल्वेतून प्रवास करणारे काही प्रवासी दुखापतग्रस्त झाल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी मध्यरात्र उलटून गेल्यानंतर बराच उशिरानं हा अपघात झाला. ज्यानंतर अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बचावकार्य तातडीनं सुरु करण्यात आलं. 

साबरमती-आगरा कँट सुपरफास्ट एक्सप्रेस (12548) या अजमेर येथील मादर रेल्वे स्थानकानजीक रेल्वेचे चार डबे रात्री एक वाजण्याच्या सुमारास रुळावरून घसरले. भरधाव वेगात असणारी ही रेल्वे मालगाडीला धडकल्यामुळं हा अपघात झाला. अपघातासमयी रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. त्यामुळं घटनास्थळी गोंधळ आणि भीतीचं वातावरण पाहायला मिळालं. 

हेसुद्धा वाचा : 'हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने....'; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा 

 

दरम्यान, या घटनेमध्ये काही प्रवाशांना झालेली किरकोळ दुखापत वगळता कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचं वृत्त यंत्रणांमार्फत देण्यात आलं आहे. दुखापतग्रस्त प्रवाशांना नजीकच्याच रुग्णालयात दाखव करण्यात आलं असून, सध्या रुळावरून रेल्वेचे डबे हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या रेल्वेच्या इंजिनासह चार डबे रुळावरून घसरले आणि अपघाताचं भीषण स्वरुप समोर आल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली. शिवाय प्रवाशांच्या मदतीसाठी आणि चौकशीसाठी रेल्वे प्रशासनानं 0145-2429642 हा हेल्पलाईन दूरध्वनी क्रमांकही जारी केला.