जयपूर : कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे अॅक्सिस बँकेची चोरी होण्यापासून रोखण्यात आली आहे.
जयपूरमध्ये असलेल्या रमेश मार्गावरील अॅक्सिस बँकेत सर्वात मोठी चोरी होणार होती. मंगळवारी राज्ञी 2.35 वाजताना अॅक्सिस बँकेत चोरांक़डून दरोडा घालण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यावेळी कॉन्स्टेबल सीताराम यांनी हवेत फायर केली. फायरिंगचा आवाज होताच चोर घटनास्थळावरून पळून गेले. कॉन्स्टेबलच्या प्रसंगाधानामुळे चोराचा हा डाव मोडून काढला आहे.
अशोक नगरचे एसीपी रामगोपाल पारीक यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितले की, कॉन्स्टेबल सितारामने हुशारीने चोरांना पळवून लावले. त्यामुळे बँकेत असलेली 925 करोड रुपयांची रोकड वाचली आहे. चोरी करण्याच्या हेतूने 15 चोर गाडीत बसून येथे आले होते. ज्यातील अनेक चोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. चोरांनी तोंडाला कपडा बांधल्यामुळे ही त्यांची स्पष्ट ओळख होत नाही.
लुटमारीचे असे अनेक प्रकार घडतात. मात्र यावेळी कॉन्स्टेबलच्या प्रसंगावधानामुळे हा प्रकार टळला आहे.