मुंबई : Rajsthan News : राजस्थानच्या धौलपूरमध्ये (Dholpur) 13 वर्षांच्या मुलीच्या अनोख्या शौर्याची बातमी समोर आली आहे. अनुष्का नावाच्या मुलीने नदीत बुडलेल्या 3 मुलांचे प्राण वाचवले. चौथ्या मुलाला वाचवताना मुलगी स्वतः पाण्यात वाहून गेली आणि तिला आपला जीव गमवावा लागला. या घटनेनंतर मुलीला तिच्या धाडसाचे खूप कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना धौलपूरच्या विनतीपुरा ग्रामपंचायतीच्या ढोलपुरा गावाची आहे. गावाजवळील पार्वती नदीच्या काठावर रक्षाबंधनानंतर ही मुले धार्मिक विधीसाठी गेली होती. विधीनंतर मुलांनी नदीत आंघोळ करण्याची योजना आखली आणि त्यांनी नदीत उडी मारली. नदीतील पाण्याचा प्रवाह खूप वेगवान होता, ज्यामुळे तीन मुले प्रवाहाबरोबर वाहताना बुडू लागली. मुलांना बुडताना पाहून अनुष्काने नदीत उडी मारली आणि तिन्ही मुलांना नदीच्या काठावर आणले.
यादरम्यान, अनुष्काची 7 वर्षांची चुलत बहीण छवी पाण्यात बुडताना पाहून तिने पुन्हा पाण्यात उडी मारली, पण यावेळी अनुष्का तिच्या बहिणीला वाचवू शकली नाही. आणि ती स्वतः पाण्याबाहेर आली नाही.
दुसरी घटना राजस्थानमधील धौलपूर येथून समोर आली, जिथे एक 32 वर्षीय तरुण नदीत बुडाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचे नाव सोनू होते आणि तो यूपीच्या आग्रा येथील रहिवासी होता. रक्षाबंधन साजरा करण्यासाठी सोनू धोलपूरला गेला. याशिवाय राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातून धक्कादायक बातमी आली, जिथे टाकू बारी गावात एकाच कुटुंबातील तीन मुले तलावात बुडाली. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुले सकाळपासून बेपत्ता होती, ज्याची माहिती कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी चप्पल आणि मोबाईलच्या आधारे मुलांचा शोध सुरू केला, त्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांना मुलांचे मृतदेह सापडले.