Viral Video : राजस्थानमधल्या (Rajasthan) भरतूपरमध्ये दोन गटात जमिनीच्या वादातून भांडण झालं, हा वाद इतका विकोपाला गेला की एका व्यक्तीला ट्रॅक्टरखाली चिरडत त्याची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आली. ही हत्या इतकी क्रुर होती की एक-दोनदा नाही तर तब्बल आठवेळी त्या व्यक्तीला ट्रॅक्टरखाली चिरडण्यात आलं. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी आरोपील अडवण्याचा प्रयत्न केला. पण तो कोणाच्याही ऐकण्याच्या मनस्थिती नव्हता. धक्कादायक म्हणजे गावातील इतर अनेक लोकं त्या ठिकाणी उपस्थित होती, पण कोणीही मृत व्यक्तीला वाचवण्यासाठी धावलं नाही, उलट घटना मोबाईलमध्ये कैद करण्यात ते दंग होते.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पोलिसांनी याप्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. जमिनीच्या वादातून दोन गटात हाणामारीही झाली होती. यात बारा जणं जखमी झाले. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भरतपूर जिल्ह्यातील (Bharatpur) बहादूर सिंह गुर्जर आणि अतर सिंह गुर्जर या दोन कुटुंबात गेल्या काही काळापासून जमिनीचा वाद सुरु होता. दोन्ही कुटुंबात तीन आधी मोठं भांडण झालं होतं. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही कुटुंबियांना समज दिली.
बुधवारी बहादुर सिंह गुर्जरच्या कुटुंबातील काही जणं वादग्रस्त जमिनीवर ट्रॅक्टर घेऊन नांगरणीसाठी गेले. याची माहिती मिळताच अतर सिंह गुर्जरच्या कुटुंबातील लोंक तिथ पोहोचले आणि त्यांनी विरोध केला. यावरुन दोन्ही कुटुंबांवरुन हाणामारी सुरु झाली. यावेळी अतर सिंह गुर्जर यांच्या कुटुंबातील 45 वर्षीय निर्पाठ सिंह गुर्जर हा ट्रॅक्टरसमोर उभा राहिला त्याने ट्रॅक्टर चालवण्यास विरोध केला. यावेळी संतापलेल्या ट्रॅक्टर चालकाने थेट निर्पाठ सिंह गुर्जरवर ट्रॅक्टर चढवला आणि त्याला चिरडलं यात निर्पाठ सिंहचा मृत्यू झाला.
आठ वेळा ट्रॅक्टरने चिरडलं
दोनही कुटुंबात भांडण सुरु असताना गावातील अनेक लोकांनी तिथे गर्दी केली. पण भांडण सोडवण्याऐवजी त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली, काही जणं व्हिडिओ बनवत होते. निर्पाण सिंह गुर्जरला त्याच्या कुटुंबियांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ट्रॅक्टर चालक वेगात निर्पाठ सिंहवर ट्र्रॅक्टर चझवत होता. एक-दोन वेळा नाही तर तब्बल आठ वेळा निर्पाठ सिंहला ट्रॅक्टरखाली चिरडण्यात आलं.
घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. निर्पाठ सिंह गुर्जरचा मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर काही जणं फरार आहे. त्यांचा शोघ घेतला जात आहे.