हैदराबादला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा

हैदराबादला मान्सूनपूर्व पावसानं जोरदार तडाखा दिलाय. जोरदार पावसामुळे हैदराबाद शहर जलमय झालंय. हैदराबाद शहराच्या सखल भागात पाणी साचलंय. 

Updated: Jun 8, 2017, 01:27 PM IST
हैदराबादला मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा title=

नवी दिल्ली : हैदराबादला मान्सूनपूर्व पावसानं जोरदार तडाखा दिलाय. जोरदार पावसामुळे हैदराबाद शहर जलमय झालंय. हैदराबाद शहराच्या सखल भागात पाणी साचलंय. 

पाणी साचल्यामुळे शहराच्या वाहतुकीचे तीनतेरा वाजलेत. जागोजागी पाणी साचल्यानं प्रचंड वाहतूक कोंडी झालीय.. गेल्या काही दिवसांपासून मान्सून जसाजसा जवळ येऊ लागलाय तसतसा हैदराबादमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे.

हैदराबादमध्ये या महिन्याच्या सात दिवसांत 108 मिमी इतक्या पावसाची नोंद झालीय. जूनमध्ये सरासरी 111.2 इतका पाऊस पडतो. मात्र पहिल्याच सात दिवसांतील या पावसामुळे हैदराबादवासियांची दाणादाण उडाली.