मुंबई : भारतीय रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गरज पाहता त्यांचा प्रवास अधिक सुखकर करण्यासाठी काही महत्त्वाचे बदल केले आहे.
स्वच्छता, सजावट आणि आवश्यक गरजा लक्षात घेता लांब पल्ल्याच्या काही ट्रेन्समध्ये हे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये १४ राजधानी आणि १५ शताब्दी एक्सप्रेसचा समावेश करण्यात आला आहे.
Ministry of Railways launched 1ST Swarna Rajdhani ( Train no 12314 New Delhi- Sealdah Rajdhani) rake today.A Major Leap in Improving Passenger Experience on Rajdhani Trains:14 Rajdhani Trains & 15 Shatabdi Trains will be upgraded under Project Swarna. pic.twitter.com/1C62BChblt
— Ministry of Railways (@RailMinIndia) November 29, 2017
डोळ्यांना शांत वाटणारी खास पेटिंग आणि रंगाकामाचा समावेश करण्यात आला आहे.
भरतीय रेल्वेतील स्वच्छतागृहांमध्ये आता 'ऑटो जनरेटर' प्रणालीचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे रेल्वेतील स्वच्छतागृहांचा दर्जा सुधारणार आहे.
रेल्वेमध्ये आता एलईडी लाईट्सचा वापर करण्यात येणार आहे. तसेच रेल्वेतील आरशांवरही एलईडी बल्ब लावले जातील.
रेल्वेतील सुरक्षा वाढवण्यासाठी आता सीसीटीव्हीदेखील लावण्यात येणार आहेत. दरवाज्याच्या भागामध्ये हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत.
रात्रीच्या वेळेस बर्थ कोठे आहे ? हे पाहता यावे याकरिता खास लाईट्सचा वापर करण्यात येणार आहे.