१० महिला क्रिकेटर्सना १ कोटी ३० लाखांचं बक्षिस

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी महिला क्रिकेट टीममध्ये असणाऱ्या रेल्वेच्या १० महिला क्रिकेटर्सना १ कोटी ३० लाखांचं पारितोषिक जाहीर केलं आहे. 

Updated: Jul 27, 2017, 06:41 PM IST
१० महिला क्रिकेटर्सना १ कोटी ३० लाखांचं बक्षिस title=

नवी दिल्ली : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी महिला क्रिकेट टीममध्ये असणाऱ्या रेल्वेच्या १० महिला क्रिकेटर्सना १ कोटी ३० लाखांचं पारितोषिक जाहीर केलं आहे. रेल्वेने अनेक गुणवान खेळाडूंना नोकरीची संधी दिली आहे. 

सुरेश प्रभू यांनी पारितोषिक देण्याचीच घोषणा केली नाही, तर रेल्वेतील महिला क्रिकेटर्सची पदोन्नती देखील केली आहे. कर्णधार मिथाली राज आणि हरमनप्रित कौर यांना गॅझेटेड ऑफिसर रँक दिली आहे.

हा सर्वांसाठी आनंदाचा दिवस आहे, रेल्वेसाठी तर सर्वाधिक महत्वाचा आहे कारण, रेल्वेने जागतिक दर्जाचे १५ पैकी १० क्रिकेटर दिले आहेत. कॅप्टन, व्हाईस कॅप्टन, विकेट कीपर, हायेस्ट स्कोरर सर्व आपले कर्मचारी असल्याचं यावेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं.