Vande Bharat Train: उत्तर प्रदेशच्या कानपूर सेंट्रल रेल्वे स्थानकात एक वडील त्यांच्या मुलाला वंदे भारत ट्रेनमध्ये बसवून पुन्हा प्लॅटफॉर्मवर उतरत असताना अचानक ट्रेनचे दरवाजे लॉक झाले आणि तो व्यक्ती आतच लॉक झाला. त्यामुळं या व्यक्तीला कानपूर ते नवी मुंबईपर्यंतचा प्रवास करावा लागला आहे. त्याचवेळी त्याला 2870 रुपयांचा दंड भरावा लागला आहे. भारतीय रेल्वेने वंदे भारतसाठीही काही वेगळे नियम बनवले आहेत. वंदे भारतमध्ये प्रवास करताना काय काळजी घ्यावी? आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेऊया.
इतर रेल्वेच्या तुलनेत वंदे भारतचे तिकिट महाग आहे. त्याचप्रमाणे नियमदेखील इतर ट्रेनच्या तुलनेत वेगळे आहेत. यात प्रवाशांच्या सुविधांविषयी विशेष काळजी घेण्यात आली आहे. यात कन्फर्म तिकिट नसल्यास तुम्ही प्रवास करु शकत नाही. त्या व्यतिरिक्त अन्य नियमदेखील आहेत.
- ट्रेनमध्ये वेटिंग तिकिटावर प्रवास करु शकत नाही
- तिकिट कन्फर्म असल्यावरच प्रवास करता येऊ शकतो
- 5 वर्षांवरील मुलांचेही पूर्ण तिकिट काढावे लागते
- ट्रेनमध्ये अस्वच्छता केल्यास 500 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागतो
- प्रवाशांना सोडायला आलेले नातेवाईक ट्रेनमध्ये चढू शकत नाही
- सुरक्षेसाठी प्रत्येक कोचमध्ये एक सुरक्षारक्षक तैनात असतो
- तिकिट कॅन्सल केल्यानंतर इतर ट्रेनच्या तुलनेत अधिक किंमत भरावी लागते
- यात ऑटोमॅटिक दरवाजे असल्याने एकदा का दरवाजे बंद झाले तर पुढील स्थानकातच उघडतात.
जर तुम्ही वंदे भारत ट्रेनचे तिकिट प्रवास सुरु करण्याच्या 48 तासांआधी कॅन्सल करत आहात तर एक फ्लॅट कॅन्सलेशन फी लागणार आहे. हा दंड सेंकड क्लाससाठी 60 रुपये आहे. तर AC फर्स्ट क्लास/एग्जीक्युटिव्ह क्लास तिकिटांसाठी 240 रुपयांपर्यंत आहे.
जर ट्रेन रवाना होण्यापूर्वी 48 तास किंवा 12 तासांपूर्वी तिकिट रद्द करता तर एकूण तिकिट भाड्यातून 25 टक्के रक्कम कट होते. या व्यतिरिक्त GST देखील द्यावा लागतो.
ट्रेन रवाना झाल्यानंतर 12 ते 4 तासांआधी तिकिट रद्द केल्यातर काही कॅन्सलेशन फीसोबतच तिकिटाची 50 टक्के रक्कम द्यावी लागते.
ज्या प्रवाशांचे तिकिट RAC किंवा वेटलिस्टेड आहे तर या ट्रेनमध्ये रेल्वेला काही सूट देण्यात येते
जर रेल्वेकडूनच तुमचं तिकिट रद्द करण्यात आले तर त्याचे संपूर्ण रिफंड तुम्हाला मिळतं
रेल्वे अॅक्ट 1989च्या सेक्शन 138 अनुसार कोणत्याही ट्रेनमध्ये विनातिकिट प्रवास करणे दंडनीय अपराध आहे. जर एखादा प्रवासी वंदे भारत किंवा अन्य कोणत्याही ट्रेनमध्ये विना तिकिट प्रवास करतो तेव्हा त्याला कमीत कमी 500 रुपयांचा दंड भरावा लागतो. त्यानंतर तिथून प्रवास सुरू केला आहे आणि जिथे जायचं आहे त्या अंतराचे तिकिट भाडे द्यावे लागेल.
TTE तुम्हाला तुम्ही भरलेल्या दंडाची रक्कम देईल. रेल्वेच्या नियमांनुसार, जर तुम्ही दंडाची रक्कम भरली नाही तर 6 महिन्यांपर्यंत तुरुंगात जावे लागू शकते.
वंदे भारत ट्रेनचे दरवाजे ऑटोमेटिक आहेत. अशा स्थितीत जर तुम्ही ट्रेनमध्ये अडकलात तर तुम्हाला पुढील स्थानाकपर्यंत प्रवास करावा लागेल. अशावेळी घाबरु नका तुम्ही TTEला किंवा अन्य सुरक्षारक्षकाला याची माहिती द्या. त्यानंतरही तुम्हाला दंडाची रक्कम भरावीच लागणार आहे.