मुंबई : आपण प्रत्येकानेच कधी ना कधी रेल्वेने प्रवास हा केलाच असेल. पण कधी तुम्ही हा विचार केलाय की, रेल्वेच्या रूळांना कधी गंज का लागत नाही, या मागचं कारण काय असेल? आपल्या घरी असलेल्या कित्येक लोखंडाच्या गोष्टींना गंज लागते. पण रेल्वेचे ट्रक देखील लोखंडाचे आहेत. त्यांना कधी गंज का लागत नाही. या दोघांमध्ये असा काय फरक आहे. जाणून घेऊया यामागचं सत्य
रेल्वेच्या ट्रकला गंज लागण्यापूर्वी मुळात गंज का लागते आणि ती कशामुळे, कुठे लागते हे जाणून घेणे गरजेचे आहे. लोखंड हा एक मजबूत धातू आहे. पण त्याच्यावर जेव्हा गंज लागते तेव्हा ते काहीच कामाचं राहत नाही.
लोखंड किंवा लोखंडाशी बनलेलं सामान ऑक्सिजन किंवा आर्द्रतेच्या संपर्कात आलं. तर लोखंडावर एक लालसर रंगाचा थर आयर्न ऑक्साइड (Iron Oxide) जमा होतं. त्यानंतर हळू हळू लोखंड खराब होतं. सोबतच त्याचा रंग देखील बदलायला लागतो. याला लोखंडाला गंज लागणे असं म्हणतात.
अनेकांना याचं उत्तर विचारल्यावर त्यांनी सांगितलं की, ट्रॅकवर रेल्वेच्या चाकांच घर्ष होत असतं. त्यामुळे गंज लागत नाही. मात्र हे यामागचं खरं कारण नाही.
रेल्वेचे रूळ बनवण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीचे स्टील वापरलं जातं. स्टील आणि मेंगलॉय (Mangalloy) याच्या मिश्रणाने ट्रेनचे रूळ तयार केले जातात. स्टील आणि मेंगलॉय यांच्या मिश्रणाला मँगनीज स्टील (Manganese Steel)असं संबोधलं जातं. यामुळे ऑक्सीकरण होत नाही. त्यामुळे अनेक वर्ष होऊनही रेल्वेचे रूळ कधीच गंजत नाहीत.
रेल्वेचे रूळ जर सामान्य लोखंडापासून तयार करण्यात आले. तर हवेतील आर्द्रतेमुळे त्याला गंज लागू शकते. यामुळे रेल्वे ट्रक कमकुवत होतील. यामुळे रेल्वेचे ट्रक खूप लवकर बदलावे लागले असते. रेल्वे अपघाचा धोका यामुळे वाढला असता. त्यामुळे रेल्वे या रूळाला खास मटेरियलने तयाप करते.