IRCTC वर मिळेल Confirm Ticket! केवळ Railway Booking करताना करा 'या' पर्यायावर क्लिक

Railway Ticket Booking :  रेल्वे तिकीट बुकिंग (Train Ticket Booking) करताना तुम्हाला फक्त काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. (Railway Ticket Booking ) तुम्हाला फक्त IRCTC वरील  एका पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर कन्फर्म तिकीट मिळेल. 

Updated: Feb 17, 2023, 12:17 PM IST
IRCTC वर मिळेल Confirm Ticket! केवळ Railway Booking करताना करा 'या' पर्यायावर क्लिक  title=
IRCTC Confirm Ticket News

IRCTC Tatkal Ticket Booking : अनेक जण रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र, तिकीट बुकिंग करताना (Train Ticket Booking)) आरक्षित तिकिट मिळेल की नाही, याची शंका असते. बरेचवेळा रेल्वे तिकीट वेटिंगवर मिळते. त्यामुळे रेल्वे तिकिट बुकिंगमध्ये थोडा विलंब झाल्यास आरक्षण उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रवासाचे टेन्शन राहते. आम्ही तुम्हाला एक अशी पद्धत सांगणार आहोत की, त्यामुळे तिकीट काढण्यासाठी उशीर होणार नाही आणि तिकीट बुकिंगही सहज होईल. तिकीट बुक करण्यासाठी, तुम्हाला फक्त एका गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. तुम्हाला फक्त IRCTC वरील पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तिकीट लवकर आरक्षित होईल. 

इंटरनेटचा वेग जास्त असावा

तिकीट बुक करण्यापूर्वी, सिस्टममध्ये इंटरनेट स्पीड उपलब्ध आहे की नाही ते तपासा. सर्व प्रथम, आपल्या डिव्हाइसवर इंटरनेटचा वेग चांगला आहे हे पाहा. कारण स्लो इंटरनेट असल्‍याने तिकीट बुकींगमध्‍ये खूप अडचणी येतात.

वेळ लक्षात ठेवा

तत्काळ तिकीट बुक करताना नेहमी वेळ लक्षात ठेवा. AC साठीच्या तिकीटासाठी तात्काळ तिकीट बुक वेळ सकाळी 10 आहे, म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही 9.58 पर्यंत लॉग इन करा. स्लीपर क्लासमध्ये तत्काळ तिकीट बुक करण्याची वेळ सकाळी 11 वाजता आहे. त्यामुळे तुम्ही 10.58 वाजता लॉगिन करा. 

एक मास्टर लिस्ट बनवा

आरक्षित जागा किंवा सीट मिळविण्यासाठी, काही वैयक्तिक तपशील आधीच भरुन ठेवा. त्यात आधार कार्ड क्रमांकही टाकावा लागेल. तिकिटे भरण्यात एवढा वेळ जातो की तिकिटे आधीच बुक केली जातात. अशा परिस्थितीत, एक मास्टर लिस्ट अगोदर तयार केली पाहिजे. जर तुम्ही तुमचे आवश्यक तपशील आधीच भरले असतील, तर तुम्हाला तिकीट बुक करताना काहीही करण्याची गरज नाही. तुम्ही नावावर क्लिक करताच, तुमचे जारी केलेले तपशील खाली दिसतील. तुम्ही त्यावर क्लिक करताच तपशील आपोआप भरला जाईल. तुमचा वेळ वाचेल. 

तपशील कसे जोडायचे?

IRCTC वेबसाइटवर 'माय प्रोफाइल' सेक्टरमध्ये मास्टर लिस्ट तयार केली जाऊ शकते. नाव, वय, ओळखपत्र आणि जन्म तारीख यांसारख्या गोष्टी भरुन प्रवाशांची यादी तयार करा. 

केवळ पेमेंट करणे आवश्यक आहे

सर्व तपशील प्रविष्ट केल्यानंतर, जेव्हा तिकीट बुक करण्याची वेळ येईल तेव्हा तुम्हाला त्यावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर प्रवाशाचे सर्व तपशील स्वयंचलितपणे भरले जातील. तुम्ही UPI, IRCTC वॉलेट किंवा इतर कोणतीही पेमेंट पद्धत वापरु शकता. तुमच्याकडे त्वरीत पैसे हस्तांतरित करण्यासाठी आणि तुमचे तिकीट बुक करण्यासाठी पुरेसा निधी असल्याची खात्री करा.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x