भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना सुखकर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी लोकप्रिय 'वंदे भारत'मध्ये आता स्लीपर कोच आणण्याच्या तयारीत आहे. एसी चेअर कार वंदे भारत एक्स्प्रेसला मिळालेला प्रतिसाद पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरुन प्रवाशांना रात्रीच्या वेळी प्रवास करताना आरामही करता येळी. सध्या ज्या वंदे भारत एक्स्प्रेस धावत आहेत, त्यांची वेळ दिवसाची आहेत. पण वंदे भारत स्लीपर ट्रेन आल्यास दूरच्या मार्गांवर रात्रीच्या वेळीही त्या चालवल्या जाऊ शकतात. वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत आल्यास राजधानी ट्रेनसारख्या लांबपल्ल्याच्या गाड्यांची जागा घेऊ शकतात. पुढील 24 महिन्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन सेवेत येईल असा रेल्वेचा अंदाज आहे.
रेल्वे विकास निगम लिमिटेडचे (RVNL) जीएम मेकॅनिकल आलोक कुमार मिश्रा यांनी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, सध्या चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरीत (ICF) प्रोटोटाइप स्लीपर वंदे भारत ट्रेन बनवण्याचं काम सुरू आहे. पुढील 24 महिन्यात या ट्रेन पूर्ण होतील अशी आशा आहे. याशिवाय 200 वंदे भारत स्लीपर ट्रेन सेट बनवण्याचा महत्त्वाचा उपक्रम सुरू आहे.
रेल्वे विकास निगम लिमिटेड रशियन कंपनी TMH सोबत लातूर येथील रेल्वेच्या कोच फॅक्टरीमध्ये 120 वंदे भारत स्लीपर ट्रेन तयार करण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहे. याशिवाय टिटागड वॅगन्स आणि BHEL संयुक्तपणे उर्वरित 80 गाड्यांचे उत्पादन करत आहेत. अशाप्रकारे एकूण 200 वंदे भारत स्लीपर ट्रेन बनवण्याची प्रक्रिया सुरू आहे. RVNL-TMH ला ट्रेन तयार करण्याचं कंत्राट मिळालं आहे. 120 कोटींच्या किंमतीवर त्यांनी ही करार मिळवला आहे. 35 हजार कोटींच्या या प्रकल्पात 120 वंदे भारत स्लीपर गाड्यांची निर्मिती आणि पुढील 35 वर्षांसाठी त्यांची देखभाल करण याचा समावेश आहे.
RVNL में जीएम मॅकेनिकल आलोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन वर्षांत या ट्रेन तयार करण्याचा प्रयत्न आहे. त्यांनी सांगितलं आहे की, प्रवाशांना रात्रीच्या वेळा आरामदायक आणि वेगाने प्रवास करण्यासाठी स्लीपर वंदे भारत ट्रेन्स सुरु करण्यात येणार आहेत. नव्या स्लीपर वंदे भारत राजधानी एक्स्प्रेससारख्या ट्रेनची जागा घेतील अशी आशा आहे.
वंदे भारतमध्ये प्रवाशांच्या सर्व सोयी सुविधांचा विचार करण्यात आला असून, त्याप्रमाणे सर्व नियोजन करण्यात आलं आहे. आसन व्यवस्था ते जेवणापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी वंदे भारतचं कौतुक केलं जात आहे. पण मुंबई ते गोवा हे 10 तासांचं अंतर पार करताना प्रवाशांना सलग बसून प्रवास करावा लागत आहे. यामुळे प्रवाशांना कंटाळा येत असून, त्यांना व्यवस्थित आराम करण्याची संधी मिळत नाही. यामुळे आता रेल्वे मुंबई-गोवा वंदे भारतमध्ये स्लीपर कोच जोडण्याचं नियोजन आखत आहे. यामुळे प्रवासी आता निसर्गाचा आनंद घेण्यासह आरामही करु शकतात.
मुंबई ते गोवा अंतर 586 किमी असून वंदे भारतने प्रवास करण्यासाठी 8 तासांचा वेळ लागतो. पण पावसाळ्यात ही वेळ दोन तासांनी वाढते. त्यामुळे मुंबईहून गोव्याला पोहोचण्यासाठी 10 तास लागतात. मात्र इतर ट्रेनच्या तुलनेत प्रवाशांचे 2 ते 3 तास वाचत आहेत.