प्रशिक्षणार्थींना थेट नोकरीत घेण्याबाबत रेल्वे मंत्र्यांचे मौन

रेल्वेची नोकरी मिळवण्याचा अधिकार सर्वांचा आहे. प्रशिक्षणार्थींनीही इतरांसोबत नोकरीसाठी प्रयत्न करावेत, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. दरम्यान, प्रशिक्षणार्थींना थेट नोकरीत घेण्याबाबत रेल्वे मंत्र्यांचे मौन बाळगले.

Surendra Gangan Updated: Mar 20, 2018, 06:24 PM IST
प्रशिक्षणार्थींना थेट नोकरीत घेण्याबाबत रेल्वे मंत्र्यांचे मौन title=

नवी दिल्ली : रेल्वेची नोकरी मिळवण्याचा अधिकार सर्वांचा आहे. प्रशिक्षणार्थींनीही इतरांसोबत नोकरीसाठी प्रयत्न करावेत, असं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. दरम्यान, प्रशिक्षणार्थींना थेट नोकरीत घेण्याबाबत रेल्वे मंत्र्यांचे मौन बाळगले.

रेल्वेत वेगवेगळ्या पदांसाठी भरती होणार असून ३१ मार्च २०१८ पर्यंत अर्ज करण्याची मुदत असल्याची आठवण  पियुष गोयल यांनी प्रशिक्षणार्थींना करून दिली. प्रशिक्षणार्थींना थेट नोकरीत घेण्याबाबतच्या आरक्षणावर काहीच भाष्य न करता त्यांनी खुल्या स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला प्रशिक्षणार्थींना दिलाय. 

दरम्यान, आज सकाळी मुंबईत प्रशिक्षणार्थीं यांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. अखेर रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रुळांवर जाऊन आंदोलकांशी चर्चा केली. त्यांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन देण्याची हमी देण्यात आली. त्यानंतर आंदोलक रुळांवरुन हटले. तब्बल साडे तीन तासांनी माटुंग्यातून लोकल सीएसटीच्या दिशेने रवाना झाली.