Shirur : "आम्ही गोट्या खेळायला आलो नाय..", रोहित पवारांनी स्वीकारलं अजितदादांचं आव्हान, म्हणाले 'अशोक बाप्पूंना...'

Rohit Pawar Warn Ajit Pawar : मंत्रीपद सोडा, तू निवडूणच कसा येतो, ते मी बघतो असं म्हणत अजित पवारांनी अशोक पवार यांना खुलं आव्हान दिलं होतं. आता हेच आव्हान रोहित पवारांनी स्विकारलं आहे.

सौरभ तळेकर | Updated: May 11, 2024, 05:33 PM IST
Shirur : "आम्ही गोट्या खेळायला आलो नाय..", रोहित पवारांनी स्वीकारलं अजितदादांचं आव्हान, म्हणाले 'अशोक बाप्पूंना...' title=
Rohit Pawar, Ajit Pawar, ashok pawar, shirur loksabha

Ajit Pawar vs Ashok Pawar in Shirur : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शिरूरमधील (Shirur) राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी अजित पवारांना (Ajit Pawar) पाठबळ दिलं पण आमदार अशोक पवार (Ashok Pawar) यांनी शरद पवार यांच्यासोबत जाण्याची वाट निवडली. त्यामुळे अशोक पवार शिरुरमध्ये एकाकी पडल्याचं चित्र दिसत होत. अशातच अजित पवार यांनी अशोक पवार यांना टार्गेट केलं अन् खुलं आव्हान दिलं. अरे, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो, असं म्हणत अजित पवारांनी थेट इशारा दिला. तसेच अजित पवार जो ठरवतो ते केल्याशिवाय सोडत नाही हे लक्षात ठेव, असं म्हणत अजित पवारांनी सज्जद दम देखील दिलाय. अजित पवारांचं हेच आव्हान आला रोहित पवारांनी (Rohit Pawar) स्विकारलं आहे.

अमोल कोल्हे यांच्या शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्रचारसभेत रोहित पवारांनी अजित पवारांसमोर दंड थोपटले. रोहित पवारांनी अमोल कोल्हे यांच्या प्रचाराला जात असताना अशोक पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली अन् विरोधकांना थेट इशारा दिलाय. त्यानंतर सभेत बोलताना देखील रोहित पवारांनी (Rohit Pawar Warn Ajit Pawar) अशोक पवार यांना पाठबळ दिलं.

काय म्हणाले रोहित पवार?

अजितदादा धमकी देतात, कसा निवडून येतो तेच पाहतो, पण आम्ही म्हणतो, स्वाभिमानी जनता आणि याच निष्ठावंत कार्यकर्त्यांची साथ असल्याने कसे निवडून येत नाहीत हेच आम्ही पाहतो आणि हेच ते निष्ठावंत आमदार अशोक बापू पवार यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली आणि डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ बैठकीला रवाना झालो, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे. 

दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील प्रचारसभेत रोहित पवारांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं. लोकसभा निवडणूक एकदा होऊ द्या. तुम्ही धमकी देणार असाल तर आम्ही सुद्घा बघून घेऊ, तुम्हाला काय करायचंय ते करा.. आम्ही राजकारणात गोट्या खेळायला आलो नाही, असं म्हणत रोहित पवारांनी थेट अजितदादांना शिंगावर घेतलं.

दरम्यान, जे धमकी देतात, ते विसरून गेले.. तेव्हा पवार साहेबांकडे पाहून शांत होते पण आज धमक्या देणाऱ्यांसोबत पवार साहेब नाहीत. जे धमक्या देतात आम्हाला त्यांना सांगायचंय ही जनता पवार साहेब आम्ही सर्व अशोक बाप्पू सोबत आहे, तुम्ही जर धमकी देत असाल तर आम्ही सुध्दा बघतो, तुम्हाला काय करायचंय करा आम्ही सुध्दा राजकारणात गोट्या खेळण्यासाठी आलो नाही, असं स्पष्ट वक्तव्य रोहित पवारांनी केलं आहे.