२० वर्षांच्या सरकारी नोकरीत त्यानं जमा केली १०० करोडची संपत्ती

तक्रार मिळाल्यानंतर अॅन्टी करप्शन ब्युरोनं एका सरकारी बाबूच्या घरावर टाकलेल्या धाडीनंतर समोर आलेली संपत्ती पाहून अनेकांचे डोळे पांढरे झालेत. 

Updated: Sep 9, 2017, 11:22 PM IST
२० वर्षांच्या सरकारी नोकरीत त्यानं जमा केली १०० करोडची संपत्ती title=

जयपूर : तक्रार मिळाल्यानंतर अॅन्टी करप्शन ब्युरोनं एका सरकारी बाबूच्या घरावर टाकलेल्या धाडीनंतर समोर आलेली संपत्ती पाहून अनेकांचे डोळे पांढरे झालेत. 

राजस्थाच्या जयपूर डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या एका सरकारी बाबूच्या घरावर ही धाड टाकण्यात आली. केवळ २० वर्षांच्या सरकारी नोकरीत या सरकारी बाबूनं जवळपास १०० करोड रुपयांची संपत्ती जमा केलीय. 

जेडीएचा ऑफिस सुपरिटेंडंट पदावर असणाऱ्या मुकेश मीणा याच्याविरुद्ध अॅन्टी करप्शन ब्युरोला तक्रार मिळाली होती. मीणाच्या तीन ठिकाणांवर धाडी टाकल्यानंतर त्याची ११ ठिकाणी प्रॉपर्टी असल्याचं समोर आलं. 

मुकेश मीणा जयपूरमधल्या आठ कोठ्यांचा मालक आहे. जयपूरच्या जवळच्याच भागांत दोन फार्महाऊसही त्यानं खरेदी केलेत. आपल्या गावातही त्यानं भलंमोठ्ठं घर बनवलंय. अनेक लग्झरी गाड्यांचा मालक मीणा आहे. 

एसीबीनं मीणाच्या या संपत्तीवर धाडी टाकत या प्रकरणाचा पर्दाफाश करणारे अनेक महत्त्वाचे कागदपत्रं जप्त केलेत. बँकांची माहिती आणि त्या बँकांतील अकाऊंटमधून झालेल्या व्यवहाराचीही एसीबीकडून चौकशी केली जातेय.