नवी दिल्ली : नमो अॅपच्या माध्यमातून तुमचा डेटा खासगी कंपनीला दिला जात असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केला आहे. नमस्कार माझं नाव नरेंद्र मोदी आहे. मी भारताचा पंतप्रधान आहे. जेव्हा तुम्ही माझं अधिकृत अॅप साईन अप करता तेव्हा तुमचा सगळा डेटा अमेरिकी कंपन्यांना माझ्या मित्रांना देतो, असं ट्विट राहुल गांधींनी केलं होतं.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचे हे आरोप पंतप्रधान कार्यालयानं फेटाळून लावले आहेत. राहुल गांधींना टेक्नोलॉजीची माहिती नसल्याची टीका पंतप्रधान कार्यालयानं केली आहे. केंब्रिज एनालिटीकाच्या डेटा चोरीमध्ये काँग्रेसचं नाव आल्यामुळे लक्ष भरकटवण्यासाठी राहुल गांधी आरोप करतायत, असं प्रत्युत्तर पंतप्रधान कार्यालयानं दिलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अत्यंत थापाडे आहेत. ते सभांसाठी, भाषणांसाठी जेथेही कुठे जातात तेथे ते थापाच मारत असतात. त्यांच्याकडे थापांचे पुस्तकच आहे, असा घणाघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. मोदी लोकांना भलतीच अश्वासने देतात. जी त्यांना पूर्ण करता येत नाहीत. ते नागरिकांच्या खात्यावर १५ लाख रूपये जमा करणार असल्याचे सांगतात. कधी रोजगार देण्याविषयी बोलतात. तडाखेबंद भाष ठोकताना ते शेतकऱ्यांना मदत करण्याचीही भाषा बोलतात. पण, त्यातले एकही अश्वासन पूर्ण होत नाही. भाषण ठोताना पुढे लोक कोण आहेत हे पाहून ते आश्वासने देत असतात. थापा मारण्यात आणि खोटे बोलण्यात मोदींना कोणीच आव्हान देऊ शकत नाही, असेही राहूल गांधी म्हणाले.
कर्नाटक दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी मलावली भागात सभा घेतली. या सभेत त्यांनी मोदींवह जोरदार टीकास्त्र सोडले. भाजप अनेक दावे करते आहे. पण, कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुक काँग्रेसच जिंकणार असा दावाही राहुल गांधी यांनी केला. कर्नाटकात येत्या काळात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. प्रमुख्याने मुख्य लढत ही भाजप आणि काँग्रेस यांच्यातच आहे. देशभरातील राजकीय स्थिती, निवडणुकांचा निकाल पाहता दोन्ही पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
दरम्यान, राहुल गांधी यांनी कर्नाटकमध्ये संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी त्यांनी विविध धार्मिक स्थळे, विद्यालये यांचे दौरे सुरू केले आहेत. आज (शनिवार, २४ मार्च) सकाळी त्यांनी म्हैसूर येथील महाराणी महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला.