नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी मनमोकळं वागतात याचं चित्रीकरण करण्याचा सोस टीम राहुलला महागात पडला आहे. हिमाचल प्रदेशमधल्या उना येथे हेलिपॅडवर हेलिकॉप्टरमधला बिघाड दुरुस्त करायला सरसावणं राहुल यांच्यासाठी नवा वाद ओढवून घेणारं ठरलं आहे.
हेलिकॉप्टरसारख्या अत्यंत संवेदनशील वाहनाच्या दुरुस्तीवेळी राहुल यांनी हस्तक्षेप का केला असा सवाल समाज माध्यमात उपस्थित केला जातो आहे. तसंच, याचं चित्रीकरण करण्याची परवानगी नसताना तसं करणं वाद आणखी वाढवणारं ठरलं आहे. हेलिकॉप्टर दुरुस्ती सुरु असताना राहुल गांधी हे मध्ये-मध्ये करत आहेत.
अखेर असं छायाचित्रण करू नका असा सल्ला राहुलच्या टीमला द्यावा लागला आहे. यानंतर हे चित्रीकरण थांबवावं लागलं. चित्रित व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात हा संवाद स्पष्टपणे ऐकू येतो आहे. हे हेलीकॉप्टर दौऱ्यात वापरलं जातं आहे.