Rahul Gandhi Disqualified : कोण आहेत पूर्णेश मोदी? ज्यांच्या याचिकेवर राहुल गांधी यांना सुनावण्यात आली शिक्षा

मोदी आडनाव प्रकरणात गुरुवारी सूरत सेशन कोर्टाने राहुल गांधी यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्यांना जामिनही मंजूर करण्यात आला. राहुल गांधी यांच्याविरोधात पूर्णेश मोदी यांनी याचिका दाखल केली होती. जाणून घेऊन हे पूर्णेश मोदी कोण आहेत?

Updated: Mar 24, 2023, 02:52 PM IST
Rahul Gandhi Disqualified : कोण आहेत पूर्णेश मोदी? ज्यांच्या याचिकेवर राहुल गांधी यांना सुनावण्यात आली शिक्षा title=

Rahul Gandhi Disqualified : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलेलं एक वक्तव्य त्यांना भोवलं आहे. 2019 मध्ये राहुल गांधी यांनी कर्नाटक निवडणुकीदरम्यान एका रॅलीत भाषण देताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या रॅलीत बोलताना त्यांनी 'सर्व चोरांचं आडनाव मोदी का असतं?' असं प्रश्न केला होता. राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर पाच वर्षानंतर निकाल देताना सूरत सेशल कोर्टाने राहुल गांधी यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांना तात्काळ जामिनही मिळाला. पण या प्रकरणाचे चांगलेच पडसाद उमटलेत. 

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द
पण हे प्रकरण इथेच थांबलं नाही. लोकसभा सचिवालयाने एक अधिसूचना जारी करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.  काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे वायनाडचे खासदार होते. पण आता  23 मार्च 2023 पासून लोकसभेसाठी अपात्र ठरले आहेत.

कोण आहेत पूर्णेश मोदी
गुजरातचे भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी सूरत सेशन कोर्टात ही याचिका दाखल केली होती. राहुल यांच्या वक्तव्यामुळे पूर्ण मोदी समाजाचा अपमान झाल्याची तक्रार त्यांनी आपल्या याचिकेत केली होती. जाणून घेऊया पूर्णेश मोदी कोण आहेत. 

नाम : पूर्णेश मोदी
जन्म दिनांक : 22 ऑक्टोबर 1965
जन्म ठिकाण : सूरत
वैवाहिक स्थिति: विवाहित
पत्नीचं नाव : बीनाबहन मोदी
राज्याचं नाव : गुजरात
शिक्षण : बी.कॉम, एलएलबी
पक्षाचं नाव : भारतीय जनता पार्टी
मतदार क्षेत्र : सूरत पश्चिम

पूर्णेश मोदी गुजरात राज्यातील सूरत शहरातील अदजान परिसरात आपल्या कुटुंबासह राहातात. 2013 मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत ते पहिल्यांदा आमदार झाले. 2013 मध्ये तत्कालीन आमदार किशोरभाई यांचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यानंतर पोटनिवडणूक झाली. यात भाजपकडून पूर्णेश मोदी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. पूर्णेश मोदी मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. 

त्यानंतर 2017 विधानसभा निवडणुकीत पूर्णेश मोदी यांनी पुन्हा भाजपकडून उमेदवारी देण्यात आली. मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास टाकला आणि पूर्णेश मोदी पुन्हा एकदा विजयी झाले. गुजरात सरकारमध्ये पूर्णेश मोदी यांनी स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण समिती सदस्य म्हणून 12 ऑगस्ट 2016 ते 25 डिसेंबर 2017 महत्त्वाची भूमिका सांभाळली.

याआधी पूर्णेश मोदी सूरतम महापालिकेचे नगरसेवक होते. याशिवाय 2009 आणि 2013-2016 दरम्यान सूरत महापालिकेत त्यांनी भाजपचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळली. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत पूर्णेश मोदी यांनी 1 लाख 11 हजार 615 मतं मिळाली. त्यांच्या विरोधात असलेल्या काँग्रेसच्या दाऊद पटेल यांना केवळ 33 हजार 733 मतं मिळाली.