"कमी शिक्षा दिल्यास चुकीचा संदेश जाईल," राहुल गांधींना दोषी ठरवताना कोर्टाने काय म्हटलं? जाणून घ्या निर्णयातील मोठे मुद्दे

Rahul Gandhi Disqualified: गुजरातमधील सूरतमधील सत्र न्यायालयाने (Surat Sessions Court) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दोषी ठरवलं असून दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. निर्णय सुनावताना कोर्टाने खासदारांनी केलेलं विधान जनतेवर मोठा प्रभाव पाडतं, यामुळे त्यांचे गुन्हे अधिक गंभीर होतात असं निरीक्षण यावेळी कोर्टाने नोंदवलं.   

Updated: Mar 24, 2023, 02:52 PM IST
"कमी शिक्षा दिल्यास चुकीचा संदेश जाईल," राहुल गांधींना दोषी ठरवताना कोर्टाने काय म्हटलं? जाणून घ्या निर्णयातील मोठे मुद्दे title=

Rahul Gandhi Disqualified: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी (Modi)आडनावरुन केलेल्या टिप्पणीबद्दल कोर्टाने तब्बल चार वर्षांनी शिक्षा सुनावली आहे. गुजरातमधील सूरत कोर्टाने (Surat Sessions Court) राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. दरम्यान कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी (Rahul Gandhi Disqualified from Lok Sabha) निलंबित करण्यात आली आहे. यामुळे देशातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान कोर्टामध्ये याचिकाकर्त्यांनी दावा केला की, सुप्रीम कोर्टाने चेतावणी दिलेली असतानाही राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केलं. कोर्टाने निर्णय सुनावताना काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवली. त्याबद्दल जाणून घेऊयात....

याचिकाकर्त्याने कोर्टात काय सांगितलं?

याचिकाकर्त्याने सुप्रीम कोर्टात दावा केला की, राहुल गांधी यांनी लिखित माफी मागितली होती. दरम्यान सुप्रीम कोर्टाने त्यांना भविष्यात अशी विधानं करु नका अशी चेतावणी दिली होती. राहुल गांधी खासदार असताना असं वर्तन त्यांनी शोभणारं नाही असंही याचिकाकर्त्याने म्हटलं. 

यावर सत्र न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलं. आरोपीला सुप्रीम कोर्टाने अलर्ट राहण्याचा सल्ला दिला होता. पण त्यांच्या वर्तनात कोणताही बदल झालेला नाही. आरोपी स्वत: खासदार असून, जनतेला संबोधित करताना जी पद्धत वापरली जात आहे ती गंभीर आहे. याचा मोठा प्रभाव असून, गंभीर आरोप आहे. जर कमी शिक्षा दिली तर जनतेमध्ये चुकीचा संदेश जाईल. तसंच मानहानीचा मुख्य उद्धेशहू पूर्ण होणार नाही. यामुळे सर्व गोष्टींचा विचार करत दोषीला दोन वर्षांची शिक्षा सुनावली जात आहे असं कोर्टाने निकाल देताना सांगितलं. 

कोर्टाने पुढे म्हटलं की, दंड आकारणं किंवा त्यासंबंधी आदेश देणं कोर्टाला योग्य वाटत नाही. यामुळे त्यांना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जात आहे. 

दरम्यान कोर्टाने राहुल गांधी यांनी शिक्षा सुनावल्यानंतर जामीनही मंजूर केला. राहुल गांधी यांनी हायकोर्टात दाद मागण्यासाठी 30 दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. कोर्टाने निर्णय सुनावला तेव्हा राहुल गांधी कोर्टात हजर होते. 

या प्रकरणाची सुनावणी गेल्या महिन्यापासून सुरु झाली होती. राहुल गांधी यांनी स्वत: कोर्टात हजर राहण्यास कोर्टाने सांगितलं होतं. दरम्यान राहुल गांधी यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये कोर्टात हजर राहत आपला जबाब नोंदवला होता. आपण दोषी नसल्याचा दावा राहुल गांधींकडून करण्यात आला होती.