नितीश कुमारांनी विश्वासघात केल्याची राहुल गांधींची घणाघाती टीका

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विश्वासघात केल्याची घणाघाती टीका राहुल गांधींनी केली आहे. नितीशकुमार आणि भाजपची गेल्या चार महिन्यापासून काल जे घडलं त्यासाठी खलंबतं सुरू होती. हे काँग्रेसला माहिती होत असाही दावा राहुल गांधींनी केला आहे.

Updated: Jul 27, 2017, 11:59 AM IST
नितीश कुमारांनी विश्वासघात केल्याची राहुल गांधींची घणाघाती टीका title=

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विश्वासघात केल्याची घणाघाती टीका राहुल गांधींनी केली आहे. नितीशकुमार आणि भाजपची गेल्या चार महिन्यापासून काल जे घडलं त्यासाठी खलंबतं सुरू होती. हे काँग्रेसला माहिती होत असाही दावा राहुल गांधींनी केला आहे.

चारवर्ष एकमेकांपासून दूर राहिल्यावर आज नितीशकुमारांनी पुन्हा एकदा भाजपसोबत सरकार स्थापन केलं आहे. आज सकाळी जेडीयूचे सर्वेसर्वा नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि बिहार भाजपचे नेते सुशील मोदी यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीशकुमार यांनी काल संध्याकाळी लालूप्रसाद यादवांशी संबंध तोडले. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. भाजपनं संध्याकाळीच नितीशकुमारांना पाठिंबा जाहीर केला. रात्री उशिरा सत्तास्थापनेचा दावा करून बिहारमध्ये आज सकाळी एनडीएची सत्ता आली आहे.

आता उद्या नितीशकुमारांचं नवं सरकार विधानसभेत बहुमत सिद्ध करले. सरकारला १३२ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा सुशील मोदींनी आधीच केलेला आहे. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक १२२चं संख्याबळ नितीशकुमारांच्या सरकारकडे आहे हे निश्चित आहे.