अहंकाराची मान शेतकऱ्यांनी झुकवली; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा करत नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

Updated: Nov 19, 2021, 10:19 AM IST
अहंकाराची मान शेतकऱ्यांनी झुकवली; राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला टोला  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मोठी घोषणा करत नवीन कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. त्यांच्या या घोषणेनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट करीत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

राहुल गांधी यांनी म्हटले की, देशाच्या अन्नदात्याने सत्याग्राहाच्या माध्यमातून अहंकाराची मान झुकवली आहे. अन्यायाच्या विरोधात मिळालेल्या विजयाबद्दल अभिनंदन.
जय हिंद, जय हिंद का किसान! 

मोदी म्हणाले की, 'कृषी अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी यांनाही कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द ( Repeal)करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू.

'आमचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, विशेषत: लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, देशाच्या कृषी जगाच्या हितासाठी, खेड्यातील गरिबांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सुधारित कृषी कायदे आणले होते. पण आम्ही प्रयत्न करूनही काही शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही.'

मोदी म्हणाले की, 'कृषी अर्थतज्ज्ञ, शास्त्रज्ञ, प्रगतीशील शेतकरी यांनाही कृषी कायद्यांचे महत्त्व पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे रद्द ( Repeal)करण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू'