Raghav Chadha Parineeti Chopra : साखरपुड्यात राघव चड्ढा यांनी परिणीतीला सर्वांसमोर केलं किस, Video Viral

Parineeti Chopra Raghav Chadha Engagement : इतक्या दिवसांच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दिल्लीत शनिवारी परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा संपन्न झाला. या साखरपुड्यातील परिणीती आणि राघव यांचा रोमँटिक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (#ParineetiRaghavEngagement)

नेहा चौधरी | Updated: May 14, 2023, 08:19 AM IST
Raghav Chadha Parineeti Chopra : साखरपुड्यात राघव चड्ढा यांनी परिणीतीला सर्वांसमोर केलं किस, Video Viral  title=
Raghav Chadha kiss Parineeti Chopra Engagement Romantic video viral on Social media trend now

Raghav Chadha Parineeti Chopra Video : गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री आणि प्रियंका चोप्राची (Priyanka Chopra) बहीण परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) हिची चर्चा सुरु होती. परिणीती आणि आप युवा नेते राघव चड्ढा (Raghav Chadha) हे एकमेकांना डेट करत असल्याचं बोलं जातं होतं. ते अनेक वेळा कॅमेऱ्यात एकत्र कैद झाले. कधी हॉटेलमधून बाहेर पडताना तर कधी IPL मॅच पाहण्यासाठी दोघे स्टुडियमवर पोहोचले होते. त्यामुळे हे दोघे एकमेकांना डेट करत असून ते लवकरच साखरपुडा करणार आहे, याची चर्चा रंगली होती. या दोघांनीही या बातम्या दुजोरा दिला नाही. त्यामुळे यामध्ये किती सत्यता आहे हे वेळच सांगणार असं होतं. (Raghav Chadha Parineeti Chopra Engagement)

नात्याला ऑफिशल शिक्कामोर्तब!

अखरे शनिवारी (13 मे 2023) ला दिल्लीत परिणीती आणि राघव यांचा साखरपुडा पार पडला. एकमेकांना अंगठी घालून त्यांनी नवीन नात्याला सुरुवात केली. या सारखपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. खरं तर या सोहळ्याला नो मोबाईल नियम होता. त्यामुळे सोहळ्यातील व्हिडीओबद्दल प्रत्येक जण उत्सुक होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood Bubble (@bollywoodbubble)

अन् राघव यांनी केली किस...

बी टाऊनमधील हे नवीन कपलचा रोमँटिक आणि खाजगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एंगेजमेंटमधील हा व्हिडीओ चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. दोघे आनंदात एकमेकांनासोबत सोहळ्यातील संगीताचा आस्वाद घेत होते. परिणीती राघव यांना मिठी मारून उभी होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. ते दोघे गाण्यामध्ये रंगले होते, परिणीती राघव यांना पाहून गाणं गात होती तेवढ्यात राघव यांनी परिणीतीला किस केली. 

तो रोमँटिक क्षण!

साखरपुडात परिणीती चोप्राच्या 'केसरी' चित्रपटातील 'वे माही' हे गाणे सुरु होतं. परिणीतीदेखील हे गाणं गात होती. जणू काही ती राघव यांच्यासाठी ते गायत होती. या गाण्यातून ते एकमेकांना आपल्या भावना व्यक्त करत होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता भावी जावया आणि मुलीमधील प्रेम पाहून वडीलही आनंदीत दिसत आहेत. 

बहिणीच्या साखरपुड्यासाठी प्रियंका खास करुन दिल्लीला आली होती. हिरवा रंगाच्या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसतं होती.