Anant Ambani Radhika Merchant Roka: कोण आहे मुकेश अंबानींची होणारी सून? लाखात एक आहे राधिका मर्चंट

अंबानींच्या घरात पुन्हा एकदा सनई- चौघडे वाजणार आहेत. नुकतंच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा रोका आणि साखरपुडा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. 

Updated: Dec 29, 2022, 04:40 PM IST
Anant Ambani Radhika Merchant Roka: कोण आहे मुकेश अंबानींची होणारी सून? लाखात एक आहे राधिका मर्चंट  title=
Radhika Merchant Anant Ambani Roka Engagement who is to be daughetr in law of mukesh Ambani

Radhika Merchant Anant Ambani Engagement : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कारण, देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत कायमच आघाडीवर असणाऱ्या अंबानींच्या घरात पुन्हा एकदा सनई- चौघडे वाजणार आहेत. नुकतंच त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा रोका आणि साखरपुडा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. कुटुंबीय आणि खास मंडळींच्या उपस्थितीत राजस्थान (Rajathan) येथील नाथद्वारामध्ये असणाऱ्या श्रीनाथजी मंदिर येथे हा संपूर्ण सोहळा पार पडला ज्यानंतर सोशल मीडियावर या खास क्षणांचे फोटोही व्हायरल झाले. 

अंबानी कुटुंबाची होणारी सून आहे तरी कोण? (Who is radhika merchant)

तिथे अंबानी कुटुंबाच्या होणाऱ्या सुनेची पहिली झलक सर्वांनी पाहिली आणि तिची ओळख जाणून घेणारे असंख्य प्रश्न सोशल मीडियावर पाहायला मिळाले. चला तर मग जाणून घेऊया राधिका मर्चंटविषयीची रंजक माहिती... 

राधिका उद्योगपती वीरेन (viren merchant) आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. भारतीय उद्योग क्षेत्रात वीरेन मर्चेंट हे एक मोठं नाव आहे. ते इनकॉर हेल्थकेअरचे चेअरमन आहेत. देशातील धनाढ्य व्यक्तींच्या यादीत वीरेन मर्चंट यांचंही नाव घेतलं जातं. 

राधिकाचं शालेय शिक्षण मुंबईतील कॅथड्रियल अँड जॉन कॉनन स्कूल आणि इकोल मोन्डियल वर्ल्ड स्कूलमधून पूर्ण केले आहे. पुढे तिनं न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीतून पॉलिटिकल सायन्सचं शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 2017 मध्ये तिनं इसप्रावा टीममध्ये sales Executive म्हणून नोकरी सांभाळली. 

हेसुद्धा पाहा : मुकेश अंबानीच्या होणाऱ्या सुनेचा आतापर्यंतचा सर्वात Glamorous लूक; बर्थडे पार्टीमध्ये केला एकच कल्ला

वयाच्या 24 व्या वर्षी तिनं आपल्या करिअरची सुरुवात केडार कन्संलटंट, देसाई अॅंड दिवानजी आणि इंडिया फर्स्ट यांसारख्या कंपनीतून केली. राधिका अॅनिमल वेलफेयर संबंधित काम करते. शिवाय ती इतरही स्वयंसेवी संस्थांसोबत काम करताना दिसते. 

व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रात सक्रिय असण्यासोबतच राधिका एक उत्तम भरतनाट्यम नृत्यांगना आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा अरंगेत्रम (Radhika merchant arangetram ceremony) सोहळा पार पडला होता. यावेळी अंबानी कुटुंबासमवेत काही सन्माननीय व्यक्तींचीही उपस्थिती पाहायला मिळाली होती. आपल्या सुनेचे कलागुण पाहिल्यानंतर व्यासपीठावर खुद्द नीता अंबानी (Nita Ambani) यांनी तिचं तोंड भरून कौतुक केलं होतं.