फुंकून उरलेल्या सिगारेटीवर हा माणूस होतोय करोडपती

तुम्ही सिगारेट फुंकत राहा... तो करोडपती होत राहणार, असा उद्योग अजून तुम्ही ऐकला नसेल

Updated: Sep 9, 2021, 06:33 PM IST
फुंकून उरलेल्या सिगारेटीवर हा माणूस होतोय करोडपती title=

पंजाब: धुम्रपान आरोग्यासाठी हानीकारक होते. मात्र धुम्रपान आरोग्यासाठी आणि पर्यावरणासाठी हानीकारक आहे. सिगारेटचा उरलेला शेवटचा थोटक्या कायम रस्त्यांवर किंवा फुटपाथवर पडलेला दिसतो. भुकलेले पक्षी किंवा प्राणी चुकून हे खातात आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. याच कचऱ्यापासून एका तरुणानं चक्क कोट्यवधी रुपये कमवले आहेत. 

सिगारेट फुकणाऱ्यांमुळे तो करोडपती बनला आहे. पंजाबच्या एका तरुणाने चक्क सिगारेटच्या थोटक्यांपासून व्यवसाय उभा केला. त्याने या थोटक्यांपासून कोट्यवधी रुपये कमवले आहेत. या तरुणाचं खूप कौतुक होत आहे. पंजाबच्या मोहाली इथे राहणाऱ्या या ट्विंकल कुमारने सिगारेटच्या थोटक्यांपासून व्यवसाय सुरू केला. त्याच्यापासून खेळणी तयार केली. इतकच नाही तर डासांना पळवून लावणारं औषधही तयार केलं आहे. 

 लॉकडाऊनमध्य़े य़ा तरुणाची नोकरी गेली होती. त्यामुळे घर चालवण्यासाठी तो कामाच्या शोधात होता. त्याने रिकाम्या वेळेचा योग्य वापर केला. काम सुरू कऱण्यासाठी त्याने व्हिडीओ पाहायला सुरुवात केली. त्यावेळी ट्विंकलला सिगारेट रिसायकलिंगबद्दल माहिती मिळाली. सिगारेट रिसायकल करणाऱ्या कंपनीशी त्याने संपर्क केला. तिथे त्याने संपूर्ण प्रोसेस समजून घेतली. 

ही प्रोसेस जाणून घेतली आणि तो शिकलाही. त्याने मोहालीमधून आपल्या कामाची सुरुवात केली. त्याने आधी सिगारेटच्या थोटक्यांना एकत्र केलं. त्याने कंपनीशी संपर्क केला. कंपनीने काही महिला कामगारांची व्य़वस्था केली. त्यामुळे महिलांनाही रोजगार मिळाला. हे थोटके प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेले असतात. त्याला खराब होण्यासाठी किमान 10 वर्ष लागतात.

या तरुणानं य़ावर प्रोसेस करून वेगवेगळी खेळणी आणि डास मारण्याचं औषध देखील तयार केलं आहे. या व्यवसायिक तरुणानं धुम्रपान न करण्याचा सल्ला दिला आहे. जे धुम्रपात करतात त्यांनी थोटके रस्त्यावर न फेकता ते बॉक्समध्येच फेकावेत असा सल्ला दिला आहे.