विमानात Air Hostess चा Manike Mage Hithe गाण्यावर जबरदस्त डान्स

या Air Hostess लाही आवरला नाही 'मानिके मगे हिते' गाण्यावर डान्स करण्याचा मोह, पाहा झक्कास डान्सचा व्हिडीओ

Updated: Sep 9, 2021, 04:59 PM IST
विमानात Air Hostess चा Manike Mage Hithe गाण्यावर जबरदस्त डान्स title=

नवी दिल्ली: 'मानिके मगे हिते' गाणं सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध झालं. श्रीलंकेच्या गायिकेला या गाण्यासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या गाण्याचे तमिळ मल्याळम व्हर्जन करण्याची मागणी देखील चाहत्यांनी केली होती. या गाण्यावर अनेकांनी रिल्स तय़ार केली. या गाण्याची क्रेझ जगभरात होत असल्याचं दिसत आहे. या गाण्याचा मोह बिग बी अमिताभ बच्चन यांनाही आवरला नव्हता.

श्रीलंकेची गायिका योहानी दिलोका डी सिल्वा हिने गायलेलं 'मानिके मगे हिते' गाणं अल्पावधित खूप लोकप्रिय झालं. या गाण्यावर डान्स करण्याचा मोह एका  Air Hostess लाही आवरला नाही. या Air Hostess ने गाण्यावर चक्क विमानात डान्स केला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तिच्या  चेहऱ्यावरील हवाभावाची खूप चर्चा होत आहे.

Air Hostess ने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा व्हिडीओ 20 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यावर लोकांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. काहींनी हार्टचे इमोजी देखील कमेंटमध्ये केले आहेत.