बर्थ डे पार्टी ठरली शेवटची, सकाळी बाहेर पडलेल्या तरूणाचा रात्री घरी आला मृतदेह, धक्कादायक घटना

आपल्या वाढदिवसादिवशी घरातून आईकडून पैसे घेऊन बाहेर पडला तरूणाचा मृतदेह घरी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Updated: Aug 10, 2022, 08:41 PM IST
बर्थ डे पार्टी ठरली शेवटची, सकाळी बाहेर पडलेल्या तरूणाचा रात्री घरी आला मृतदेह, धक्कादायक घटना title=

Drugs Overdose Death : आताची तरूणाई व्यसनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे. एकदा अनुभव घेऊन बघू असा किंवा मजा म्हणून तरूण व्यसन करतात. मात्र, ही मजाच त्यांना कायमचं व्यसन लावून जाते. अशातच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये वाढदिवसादिवशी बाहेर गेलेल्या तरूणाचा रात्री घरी मृतदेह आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हर्ष असं मृत तरूणाचं नाव आहे. पंजाबमधील गुरूदासपूर येथील ही घटना आहे. (21year boy Death On Birthday)

नेमकं काय घडलं?
हर्ष आपल्या वाढदिवसादिवशी घरातून आईकडून पैसे घेऊन बाहेर पडला. त्यानंतर मित्रांसोबत तो फिरत होता, त्यांनी पार्टीसाठी एका ठिकाणहून ड्रग्ज खरेदी केले. त्यानंतर ते ड्रग्ज घेत होते मात्र वाढदिवस असल्यामुळे त्याने ड्रग्जचं जास्त प्रमाणात सेवन केलं आणि हर्षचा मृत्यू झाला.

हर्षचा असा मृत्यू झाल्यामुळे घाबरलेल्या मित्रांनी त्याचा मृतदेह अज्ञात ठिकाणी टाकण्याचं ठरवलं. त्यानंतर ते मृतदेह घेऊन गेले मात्र पोलिसांना सापडले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला. सकाळी बाहेर गेलेल्या 21 वर्षाच्या तरूण मुलाचा रात्री मृतदेह पाहून त्याच्या आईला धक्का बसला. 

दरम्यान, पोलिसांनी हर्ष आणि त्याच्या मित्रांना ड्रग्ज देणाऱ्या महिलेला अटक केली आहे. प्रमिला देवी असं त्या महिलेचं नाव असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांनी हर्ष आणि त्याच्या मित्रांना ड्रग्ज देणाऱ्या महिलेला अटक केली आहे. प्रमिला देवी असं त्या महिलेचं नाव आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.