रोज हेल्मेट घालणाऱ्यांनी हे काम जरूर करा, नाहीतर होईल मोठं नुकसान

दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक झालं आहे. हे नियमांसाठीच महत्वाचं नाही, तर यामुळे तुमचं संरक्षण देखील होतं.

Updated: Aug 10, 2022, 08:21 PM IST
रोज हेल्मेट घालणाऱ्यांनी हे काम जरूर करा, नाहीतर होईल मोठं नुकसान title=

मुंबई : दुचाकी चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक झालं आहे. हे नियमांसाठीच महत्वाचं नाही, तर यामुळे तुमचं संरक्षण देखील होतं. मात्र, हेल्मेट घालणाऱ्यांना विचारालं तर त्यांच्या केसांचा त्रास होतो. वास्तविक हेल्मेट घातल्याने केसच खराब होतेच, पण केस गळण्याची समस्याही सुरू होते. हेल्मेट जास्त वेळ घातल्याने आधीपासून असलेल्या केसांची समस्या वाढू शकते. आज आम्ही तुम्हाला या समस्येवर उपाय काय आहे ते सांगत आहोत.

वास्तविक, हेल्मेट जास्त वेळ घालणे तुमच्या केसांसाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे तुमच्या डोक्यात घाम येतो. घाम आणि घाण केसाच्या मुळांना इजा करतात, ज्यामुळे केस गळतात. जर तुम्हाला अशा प्रकारचे नुकसान टाळायचे असेल तर खाली नमूद केलेल्या काही टिप्स अवश्य वापरा.

- सर्वात पहिलं तर दुसऱ्यांचा हेल्मेट वापरणं टाळा, एवढंच नाही तर हेल्मेट शेअरिंग देखील टाळा, कारण यामुळे दुसऱ्यांच्या केसाची घाण तुमच्या केसाला लागले आणि यामुळे केस गळतीसह त्वचेच्या आणखी समस्या उद्भावतात.

- तसेच हेल्मेट घातल्याने डोक्यात घाम येतो, त्यामुळे हेल्मेटचा आतील थर ओला होतो. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी हेल्मेट नियमितपणे स्वच्छ करणे महत्त्वाचे आहे.

- हेल्मेट स्वच्छ आणि हवेशीर ठिकाणी ठेवा जेणेकरून ते सहज सुकेल

- जर तुम्ही बराच वेळ प्रवास करत असाल, तर मधेच ब्रेक घेणे आणि हेल्मेट काढणे चांगले. असं करुन केस आणि हेल्मेट सुकायला थोडा वेळ मिळेल.

- डोक्यावर सुती कापड बांधणे हा सर्वात चांगला मार्ग आहे. हेल्मेट घालण्यापूर्वी डोक्यावर कापड घातल्याने केस गळण्याचा धोका कमी होतो.

- हेल्मेट स्कल कॅपचे अनेक प्रकार बाजारात विकले जातात. तुम्ही हे ऑनलाइन खरेदी करू शकता. तथापि, आपण नियमितपणे ते वापरावे, पण हा कपडा नियमीतपणे नक्की धुवा.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)