नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेबाबात मोठी चूक केल्याप्रकरणी पंजाबच्या (Punjab) मुख्य सचिवांनी (Chief Secretary Of Punjab) केंद्रीय गृह मंत्रालयाला (MHA) स्पष्टीकरण सादर केले आहे. त्यांनी आपल्या उत्तरात अशा कोणत्या घटना घडल्या ज्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेत त्रुटी राहिल्या हे सांगितले आहे.
पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींबाबतचा अहवाल राज्यातील उच्च पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून तयार करण्यात आला आहे.
पंजाबच्या मुख्य सचिवांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलेल्या रिपोर्टमध्ये सांगितले आहे की, संपूर्ण पंजाबमध्ये निदर्शने पाहता अतिरिक्त फौजा तैनात करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय पथक नेमण्यात आले आहे. मात्र, भाजपने पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटी सुनियोजित असल्याचे सांगितले जात आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत कुचराई केल्याबद्दल केंद्र सरकार पंजाब पोलिसांच्या अधिकार्यांवर कारवाई करण्याचा विचार करत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकार एसपीजी (SPG) कायद्याच्या कलम 14 अंतर्गत पंजाबच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत सल्ला घेतला जात आहे. SPG कायद्याचे कलम 14 पंतप्रधान यांच्या सुरक्षेसाठी राज्यांच्या जबाबदारीशी संबंधित आहे.
5 जानेवारीला पंजाबमधील फिरोजपूरमध्ये पीएम मोदी यांचा कार्यक्रम होता. भटिंडा विमानतळावर जात असताना पंतप्रधानांचा ताफा फिरोजपूरमधील उड्डाणपुलावर 15-20 मिनिटे अडकून पडला होता. यावेळी पंतप्रधानांच्या ताफ्यापासून काही अंतरावर निदर्शने सुरु होती.