Punjab CM भगवंत मान यांचे दोन मोठे निर्णय, खाजगी शाळांना दणका दिल्याने पालक खूश

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे.

Updated: Mar 30, 2022, 04:57 PM IST
Punjab CM भगवंत मान यांचे दोन मोठे निर्णय, खाजगी शाळांना दणका दिल्याने पालक खूश title=

चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांनी बुधवारी शिक्षण क्षेत्रात (Education Sector) दोन मोठे निर्णय घेतले आहेत. त्यांनी खासगी शाळांना (Private School) फी वाढ करण्यास बंदी घातली आहे. म्हणजेच प्रवेश शुल्कात कोणतीही वाढ होऊ दिली जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. आता कोणतीही शाळा कोणत्याही विशिष्ट दुकानातून पुस्तके आणि कपडे खरेदी करण्यास पालकांना सांगणार नाही. पालक आपल्या सोयीनुसार कोणत्याही दुकानातून आपल्या मुलासाठी पुस्तक-ड्रेस खरेदी करू शकतील. ( Punjab Chief Minister Bhagwant Mann another big announcement on private schools )

पंजाबमध्येही घरोघरी शिधा वितरण

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सोमवारी देखील एक मोठी घोषणा केली होती. दिल्लीप्रणाणेच पंजाबमध्येही घरोघरी शिधा पोहोचवण्याची घोषणा त्यांनी केली होती. म्हणजेच आता सरकार रेशन घरोघरी पोहोचवणार आहे.

भगवंत मान म्हणाले, रेशन घरोघरी पोहोचवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, ही योजना पर्याय म्हणून राहणार आहे. आमचे अधिकारी कॉल करतील आणि वेळ विचारतील. त्याच वेळी रेशनचे वितरण केले जाईल.

आमदारांच्या पेन्शनमध्ये कपात

सत्तेत आल्यापासून भगवंत मान एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. त्याआधी भगवंत मान यांनी आमदारांच्या पेन्शनबाबत मोठी घोषणा केली होती. भगवंत मान यांच्या म्हणण्यानुसार, आता आमदारांना एकदाच पेन्शन मिळणार आहे. आत्तापर्यंत प्रत्येक वेळी आमदार झाल्यावर पेन्शनची रक्कम जोडली जायची. इतकंच नाही तर आमदाराच्या कुटुंबीयांना मिळणारी पेन्शनही कमी करण्याची घोषणा मान यांनी केली होती. या निर्णयामुळे जे कोट्यवधी रुपये वाचणार आहेत ते गरीब कल्याणासाठी वापरणार असल्याचे मान म्हणाले होते.