नवी दिल्ली : राजकारण्यांच्या शेजारी नेहमीच त्यांच्या चाहत्यांचा गराडा असतो. त्यांचे अनुयायी कानाकोपऱ्यात पहायला मिळतात. आपल्या नेत्याच्या गुडबॉक्समध्ये राहण्यासाठी ते सतत धावपळ करीत असतात. राहुल गांधी यांचा एक जबरा फॅन समोर आला आहे.
राहुल यांच्या या आगळ्यावेगळी महत्वकांक्षा असलेला फॅन सध्या चर्चेत आहे.हरियाणाच्या जिंदमध्ये राहणारे २३ वर्षीय पंडित दिनेश शर्मा हा कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मोठे चाहता आहे. राहुल गांधी हे भारताचे पंतप्रधान बनावेत अशी त्याची मनापासूनची इच्छा आहे.
राहुल गांधी पंतप्रधान होईपर्यंत तो चप्पल घालणार नाही. दिनेश हा गेली ७ वर्षे राहुल यांच्यासोबत फिरत असून ते आपल्या निश्चयावर ठाम आहेत. एवढेच नव्हे तर राहुल गांधी यांचे लग्न होईपर्यंत आपण देखील लग्न करणार नसल्याचा निश्चय दिनेश शर्माने केला आहे.
२००५ मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राणेंच्या विरोधात सेना नेते अरविंद भोसले यांनी शड्डू ठोकला. राणेंना पराभूत करत नाही तोपर्यंत अनवाणी पायाने चालण्याचा निर्धार त्यांननी केला होता. राणेंनी सेना संपविण्याची भाषा केली तसेच पोटनिवडणूकही जिंकली होती. २१ नोव्हेंबर २००५ रोजी त्यांनी चप्पल घालणे सोडले आणि मागच्या विधानसभा निवडणूक राणेंना हरविल्यानंतर त्यांनी चप्पल घातली.
राहुल यांचा हा पंडित दिनेश शर्मा हा फॅन आपल्या नावासमोर पंडित लावतो. यामागेही एक वेगळे कारण आहे. पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यापासून प्रेरित असल्याने त्याचे आजोबा स्वत:च्या नावासमोरही पंडित लावत असत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन दिनेशही नावाआधी पंडित हा शब्द लावतो.