नवी दिल्ली : आज 14 फेब्रुवारी २०२१ ला पुलवामा हल्ल्यास 2 वर्ष झाली असताना पुन्हा हल्ल्याचा कट उधळवून लावण्यात आलाय. जम्मूमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट शिजत होता. सुरक्षादलानं कारवाई करत मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केलीय.
जम्मू बसस्टॅंडवर 7 किलो आयईडी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. पुलवामा हल्ल्याला आज दोन वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभुमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात होता. यावेळी मोठ्या हल्ल्याचा कट सुरक्षा दलानं उधळलाय.
स्फोटकं सापडताच सुरक्षा जवानांनी शोधमोहिम सुरु केलीय. दरम्यान याबाबत दुपारी साडेतीन वाजता पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.