अहमदाबाद : सुप्रीम कोर्ट आणि सेंसर बोर्डाने फिल्म रिलीजला हिरवा कंदिल दिल्यानंतर आता पुन्हा पद्मावत सिनेमाचा वाद पेटायला लागला आहे.
चार दिवसानंतर संजय लीला भंसाली यांचा पद्मावत सिनेमा रिलीज होणाप आहे. पण सिनेमाच्या विरोधात लागलेली आग विझण्याचं नाव नाही घेत आहे. करणी सेनेच्या दहशतीमुळे गुजरातमधील सिनेमागृहाच्या मालकांनी सिनेमा न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. सिनेमाच्या विरोधात गुजरातच्या मेहसाणामध्ये राजपूत संगठनांनी दोन बसमध्ये आग लावली. आनंदमध्ये देखील रस्त्यावर विरोध प्रदर्शन झालं.
अहमदाबादमधील राजहंस सिनेमागृहात करणी सेनेने तोडफोड केली. जयपूरमध्ये देखील रस्त्यांवर टायर जाळण्यात आले. वाद संपवण्यासाठी संजय लीला भंसाली यांनी करणी सेनेला सिनेमा पाहण्याचं आमंत्रण दिलं आहे. पण करणी सेना आपला निर्णय बदलण्यासाठी तयार नाही आहे.
राजपूत संगठनेचे नेते-कार्यकर्ता मल्टिप्लेक्समध्ये जाऊन धमकी देत आहेत. त्यामुळे सिनेमा दाखवण्यास मालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Gujarat: Protesters vandalised Rajhans Cinemas in Ahmedabad late last night #Padmaavat pic.twitter.com/bGhCu7TNNh
— ANI (@ANI) January 21, 2018