Property Tips : घर खरेदी करण्यापूर्वी हे 5 कागदपत्रं नक्की तपासा

आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती मोठ्या मेहनतीने यासाठी पैसे गोळा करतो.

Updated: Apr 15, 2022, 05:27 PM IST
Property Tips : घर खरेदी करण्यापूर्वी हे 5 कागदपत्रं नक्की तपासा title=

मुंबई : आपलं स्वत:चं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती मोठ्या मेहनतीने यासाठी पैसे गोळा करतो. या सगळ्या जर एक जरी चुक झाली तरी हे मेहनतीने पैसे वाया जाऊ शकतात आणि असं बऱ्याच लोकांसोबत घडलं देखील आहे. त्यामुळे नवीन घर विकत घेताना या गोष्टी तुम्हाला माहित असायलाच हव्यात. तुम्हीही घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

नवीन मालमत्ता खरेदी करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. काही वेळा छोट्याशा चुकीमुळे लोक फसवणुकीला बळी पडतात. अशावेळी कोणती कागदपत्रे पाहावीत आणि काय करावंत, 

एका आकडेवारीनुसार, देशातील विविध न्यायालयांमध्ये सुमारे 4.5 कोटी खटले पडून आहेत, त्यापैकी मोठ्या प्रमाणात मालमत्तेशी संबंधित प्रकरणेही आहेत. अशा स्थितीत घर खरेदी करताना काही खबरदारी घ्यावा लागतात. ज्याची जाणीव ठेवल्यास आपण अनेक अडचणींपासून दूर राहू शकतो.

यामध्ये मालमत्तेची कागदपत्रे तपासणे हे अत्यंत गरजेचे आहे. मालमत्ता विकत घेण्यापूर्वी, तुम्ही खरेदी करत असलेली जमीन किंवा घर कोणत्याही नियामक प्राधिकरणाच्या अखत्यारीत येते की, नाही याची पूर्ण तपासणी करा. म्हणजेच मालमत्ता महापालिका, नगरपालिका यांसारख्या प्राधिकरणाच्या मर्यादेत येते की नाही हे तपासा.

तुम्हाला हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे की, तुम्ही तुमचे स्वप्नातील घर कोठे खरेदी करणार आहात यासाठी संबंधित प्राधिकरणाने सर्व मंजूरी दिली आहे की नाही? याशिवाय बिल्डरकडे टायटल डीड, रिलीझ सर्टिफिकेट, मालमत्ता कराची पावती, अग्निशमन मंजूरी अशा प्रकल्पाची सर्व कागदपत्रे आहेत का, हेही पाहायचे आहे.

ही सर्व महत्त्वाची कागदपत्रे आहेत जी तुम्ही तपासली पाहिजेत. यासह, तुम्हाला जमिनीसंबंधीत पडताळणी आणि RERA प्रमाणपत्र देखील पाहावे लागेल. त्याला बांधकाम मंजुरी प्रमाणपत्र असेही म्हणतात.

तुम्ही विकासकाकडून बांधकामाधील मालमत्ता खरेदी करत असताना हा दस्तऐवज अनिवार्य आहे. तो बिल्डरचा फ्लॅट, जमीन किंवा घर असू शकतो. या प्रमाणपत्रामध्ये स्थानिक प्राधिकरणांकडून आवश्यक मान्यता, परवाने आणि परवानग्या मिळाल्यानंतरच आपण बांधकाम सुरू करु शकतो.

जर तुम्ही मेट्रो कनेक्टिव्हिटी किंवा कोणत्याही मोठ्या प्रकल्पाजवळ गुंतवणूक केली, तर भविष्यात तुमच्या मालमत्तेची किंमत वाढण्याची शक्यता जास्त आहे आणि तुम्हाला त्यातून चांगला परतावा मिळू शकतो. याशिवाय तुमच्या मालमत्तेजवळ घाण पसरवणारा उद्योग तर नाही ना हेही पाहावे. यासोबतच तुम्ही खरेदी करत असलेल्या प्रॉपर्टीमध्ये शाळा, हॉस्पिटल यासारख्या सुविधा आहेत की, नाही हे देखील तपासा.

प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच स्थानिक अधिकाऱ्यांकडून हे प्रमाणपत्र दिले जाते. यावरून हे सिद्ध होते की बांधलेली मालमत्ता कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर नियमांचे उल्लंघन करत नाही. त्यात पाणी, सांडपाणी आणि वीज जोडण्यांशी संबंधित माहितीही आहे.