Alia Bhatt | आलियाची कार्बन कॉपी, तिचं सौंदर्य पाहून रणबीरही गोंधळेल

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे काल (15 एप्रिल) रोजी लग्न झाले. परंतू सोशल मीडियावर आणखी एका आलियाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे

Updated: Apr 15, 2022, 03:30 PM IST
Alia Bhatt | आलियाची कार्बन कॉपी, तिचं सौंदर्य पाहून रणबीरही गोंधळेल  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्टचे काल (15 एप्रिल) रोजी लग्न झाले. परंतू सोशल मीडियावर आणखी एका आलियाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. आलियाच्या या डुप्लिकेट मुलीला पाहून स्वतः रणबीर कपूर देखील गोंधळू शकतो की, खरी आलिया कोण म्हणून... अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

नेटकरी गोंधळले 

हा व्हिडीओ पाहून काहींना असे वाटते की आलिया भट्टने तिचे वजन वाढवले ​​आहे. तर काहींना वाटते की, हा आलिया भट्टचा मेकओव्हर आहे. परंतू ती आलिया भट्ट नाही. आलिया भट्ट इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या स्टारमध्ये गणली जाते आणि तिचे अनेक फॅन पेज आहेत. पण व्हिडीओमध्ये दिसणारी ही मुलगी प्रत्यक्षात आलियाची डुप्लिकेट आहे.

-

Ranbir Alia Wedding : रणबीरनं जेव्हा आलियाला थेट जेजुरी स्टाईल उचलून घेतलं

बॉलिवूडचं हॉट कपल आलिया भट आणि रणबीर कपूर (Ranbir and Alia) अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. खास बॉलिवूड सेलिब्रिटींच्या उपस्थितीत वांद्र्यातल्या वास्तू बंगल्यात यांचा (Ranbir and Alia marriage) शाही विवाहसोहळा पार पडला.

Ranbir Alia Wedding : रणबीरनं जेव्हा आलियाला थेट जेजुरी स्टाईल उचलून घेतलं

बॉलिवूडचं हॉट, सेन्सेशनल कपल अखेर लग्नाच्या बेडीत अडकलं आहे. रणबीरच्या वास्तू या बंगल्यामध्ये आलिया आणि रणबिरचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला. नव्या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी नीतू, रिधिमा, करिना, करिष्मा, रणधीर, बबितासह सगळे कपूर्स आणि बॉलिवूडचे मोजके निमंत्रित पाहुणे उपस्थित होते. आलिया आणि रणबीरनं सब्यसाचीनं डिझाईन केलेले कपडे लग्नसोहळ्यात घातले होते.  

मोतिया रंगाची शेरवानी, त्यावर मोत्याची माळ, आणि फेटा असा रणबीरचा पेहराव होता... तर एम्ब्रॉयडरी केलेली मोतिया रंगाची साडी, सोनेरी कुंदनचे सोनेरी दागिने, डोक्यावर ओढणी असा आलियाचा थाट होता. पारंपारिक पंजाबी पद्धतीनं सग्नसोहळा पार पडला. लग्नसोहळ्यात जोरदार फोटोसेशनही झालं.