पक्षाने सांगितले तर निवडणूक लढविणार - प्रियंका गांधी-वाड्रा

पक्षाला गरज असेल तर मी निवडणुकीसाठी तयार आहे, असे संकेत प्रियंका गांधी यांनी दिले आहेत.  

ANI | Updated: Mar 27, 2019, 11:32 PM IST
पक्षाने सांगितले तर निवडणूक लढविणार - प्रियंका गांधी-वाड्रा title=

अमेठी : काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी प्रियंका गांधी-वाड्रा निवडणूक रिंगणात उतरल्यात आहेत. आता तर त्यांनी पक्षाने सांगितले तर आपण निवडणूक लढविण्यास तयार आहोत. पक्षाला गरज असेल तर मी निवडणुकीसाठी तयार आहे, असे संकेत काँग्रेसच्या सरचिटणीस आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी दिले आहेत. त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी दर्शवली आहे. पक्षाने सांगितल्यास निवडणूक लढवायला तयार आहे, असे प्रियंका गांधी म्हणाल्या, असे वृत्त एएनआयने दिले आहे. अमेठीतील दौऱ्यात त्यांना निवडणूक लढवण्यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले.

दरम्यान, निवडणूक लढविण्याचा मी अद्याप कुठलाही निर्णय घेतलेला नाही. पण पक्षाने आदेश दिल्यास नक्कीच निवडणूक लढवेन. आपल्याला पक्षासाठी काम करण्याची इच्छा आहे, असे प्रियंका म्हणाल्या. निवडणुका आल्याने प्रियंका गांधींना मंदिरांची आठवण झाली, असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला होता. आदित्यनाथ यांच्या आरोपांनाही प्रियंका गांधी यांनी यावेळी उत्तर दिले. निवडणुका आल्यावरच आपण मंदिरात जातो हे योगी कसे काय सांगू शकतात. निवडणुका नसतात तेव्हाही आपण मंदिरात जातच होतो, असे प्रियंका गांधी यांनी स्पष्ट केले.