प्रियंका गांधी रायबरेली तर स्मृती इराणी अमेठी दौऱ्यावर

प्रियंका गांधी आणि स्मृती इराणींचा दौरा

Updated: Oct 22, 2019, 01:21 PM IST
प्रियंका गांधी रायबरेली तर स्मृती इराणी अमेठी दौऱ्यावर title=

रायबरेली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा आज दोन दिवसांच्या रायबरेलीच्या दौऱ्यावर जाणार आहेत. याठिकाणी पक्ष मजबुतीकरणासाठी कार्यकर्त्यांशी त्या चर्चा करणार आहेत. काँग्रेस पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेतही त्या हजेरी लावणार आहेत. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी अमेठीचा दौरा करणार आहेत. अमेठीत जिल्हा रुग्णालयाचं त्या उदघाटन करणार आहेत. त्यासाठी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेलही उपस्थित राहणार आहेत. गेल्या रविवारीही स्मृती इराणींनी मतदारसंघाचा दौरा केला होता. याठिकाणी महात्मा गांधी संदेश यात्रेत त्या सहभागी झाल्या होत्या.

काँग्रेसच्या बैठकीत आगामी रोड मॅप तयार करण्यात येणार आहे. सोबतच कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पक्षाला मजबूत करण्यासाठी काही जणांना जबाबदारी देखील दिली जाणार आहे. नव्या कमिटीतील सदस्यांना जबाबदारी दिली जाणार आहे.

काँग्रेसच्या या कार्यशाळेत पदाधिकारी आपल्या भागाचा अहवाल देणार आहेत. या कार्यशाळेत आगामी रणनीतीबाबत प्रियंका गांधी या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.