तिरुअनंतपुरम : केरळमध्ये पावसाचं थैमान सुरूच आहे. आत्तापर्यंत पावसामुळे शंभर जणांचा बळी गेला. आणखी तीन दिवस जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे तिरुअनंतपुरम आणि एर्नाकुलममध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अनेक भागात पावसाचा रेल्वे सेवेवर परिणाम झाला आहे. केरळच्या किनारपट्टीवर ४५ ते ५५ किमी वेगानं वारं वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
केरळमध्ये शंभरहून अधिक जणांचा बळी गेला असून २ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. हवामान विभागाने पुढचे 4 दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असून 12 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
अलापुझा, तिरुअनंतपुरम, पतनमतिट्टा, कोल्लम, कोयट्टम, एर्नाकुलम, इडुक्की, पलक्कड, त्रिशूर, कोझिकोड, मलप्पुरम, वायनाडमध्ये पावसाच जोर अधिक असण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.