श्रीहरीकोटा : चांद्रयान-२ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर जगभरातून भारतावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. श्रीहरीकोटा येथून दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी हे प्रक्षेपण झाले. याआधी हे प्रक्षेपण १५ जुलै रोजी होणार होते. पण उड्डाणाच्या ५६ मिनिटे आधी तांत्रिक अडचणीमुळे हे प्रक्षेपण रोखण्यात आले होते. त्यानंतर आज इस्त्रोने या यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले. भाजपा नेत्या सुषमा स्वराज, अभिनेता अक्षय कुमार, माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवाग, काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनीही इस्त्रोच्या यशस्वी मोहिमेला शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या मोहिमेबद्दल शास्त्रज्ञांचे कौतूक केले.
चांद्रयान-२ चे प्रक्षेपण हा प्रत्येक भारतीयासाठी आनंदाचा क्षण असल्याचे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. चांद्रयान-२ चे प्रक्षेपण हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या कार्यालयातून हे लाईव्ह प्रक्षेपण पाहीले.
#WATCH Delhi: Prime Minister Narendra Modi watched the live telecast of #Chandrayaan2 launch by ISRO, at 2:43 pm today. (Earlier visuals) pic.twitter.com/drh8o4oTWj
— ANI (@ANI) July 22, 2019
चांद्रयान २ चे एकूण ३ प्रमुख भाग आहेत. चंद्राभोवती फिरणारा ऑर्बिटर, चंद्रावर उतरणारा लँडर आणि चांद्रभूमीवर संचार करणारा रोव्हर. या तीन भागांवर एकुण १३ वैज्ञानिक उपकरणे आहेत. त्यांची निर्मिती इस्रोनेच केली आहे. चांद्रयान- २ चा लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. जिथे आत्तापर्यत कोणताही देश उतरलेला नाही. लँडर हा चांद्रभुमीवर अलगद उतरेल तेव्हा चंद्रावर साँफ्ट लॅंडींग करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.
चांद्रयान २ हे पृथ्वीपासून १७० किलोमीटर उंचीवर प्रक्षेपित केले जाईल. त्यानंतर हे यान पृथ्वीभोवती १७० किलोमीटर बाय ४० हजार ४०० किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत राहील. पृथ्वीला प्रत्येक प्रदक्षिणा घालताना चांद्रयान -२ ची कक्षा वाढवत नेली जाईल आणि ऑगस्ट महिन्याच्या मध्यात चांद्रयान - २ हे चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल. तिथेही सुरुवातीला लंबवुर्तळाकार कक्षेत चंद्राभोवती फेऱ्या मारल्यावर १०० किलोमीटर बाय १०० किलोमीटर या कक्षेत चांद्रयान -२ स्थिरावेल. मग या यानातून लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सुमारे १५ मिनीटांचा प्रवास करत अलगद उतरेल. या लँडरच्या पोटातून रोव्हर बाहेर पडेल आणि चांद्रभूमीवर मुक्त संचार करु लागेल. ऑर्बिटर, लँडर आणि रोव्हरवरील विविध उपकरणांमुळे चंद्राबद्दल विविध माहिती मिळायला सुरुवात होईल.
Special moments that will be etched in the annals of our glorious history!
The launch of #Chandrayaan2 illustrates the prowess of our scientists and the determination of 130 crore Indians to scale new frontiers of science.
Every Indian is immensely proud today! pic.twitter.com/v1ETFneij0
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2019
चंद्राच्या बाबतील आत्तापर्यंत अनेक संशोधन मोहिमा पार पाडल्या असल्या तरी, इस्त्रोच्या २००८ मधील चांद्रयान १ मोहिमेत चंद्रावर पृष्ठभागाखाली पाणी असल्याचे सिद्ध झाले होते. तेव्हा आता चांद्रयान - २ मोहिमेत कोणता वेगळा शोध लागतो, चंद्राबद्दची आणखी कोणती वेगळी माहिती समोर येते याची उत्सुकता आहे.