समाजातील प्रत्येक वाईट वृत्तीचा पराभव करुया - नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या

Updated: Oct 8, 2019, 10:09 AM IST
समाजातील प्रत्येक वाईट वृत्तीचा पराभव करुया - नरेंद्र मोदी title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : आज देशभरात दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. वाईटावर चांगल्याचा विजय मिळवणारा हा पर्व रावणाचे दहन, आपट्याची पाने वाटून साजरा केला जातो. देशभरात दसऱ्याचा उत्साह असून सर्वजण एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

आज विजयादशमीच्या मुहूर्तावर रावण दहनाची परंपरा आहे. रावण दहन हा या परंपरेचा हिस्सा आहे. परंतु एक नागरिक म्हणून समाज जीवनात जी काही रावण प्रवृत्ती आहे, त्याचा विनाश करण्यासाठीही समाजाने निरंतर जागृत प्रयत्न करणे आवश्यक आहे. आज विजयादशमीच्या मुहूर्तावर आपणही संकल्प करुया की, स्वार्थासाठी समाजात भेद करणारी प्रत्येक शक्ती, प्रत्येक वाईट वृत्तीला आपल्याला पराजित करायचे आहे, असे म्हणत पंतप्रधानांनी जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील जनतेला विजयादशमीच्या  शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयादशमी या उत्सवासह, आज ८७वा भारतीय हवाई दल दिनही साजरा केला जात आहे. १९३२ मध्ये आजच्याच दिवशी हवाई दलाची स्थापना झाली होती. 

नरेंद्र मोदींनी भारतीय हवाई दल दिनी सर्व जवानांचे त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीदेखील सैन्यातील जवानांचा अभिमान असल्याचे सांगत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.