दसऱ्याच्या शुभदिनी सोन्या, चांदीचे दर जाणून घ्या

पाहा आताचे दर 

Updated: Oct 8, 2019, 09:44 AM IST
दसऱ्याच्या शुभदिनी सोन्या, चांदीचे दर जाणून घ्या  title=

मुंबई : साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक असा दसरा सण सर्वत्र साजरा केला जातो. याचं दिनाचं औचित्य साधून लोकं सोने खरेदी करण्याचा विचार करतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोने खरेदी करायचं की नाही या संभ्रमात लोकं आहेत. पण आज सोन्याचे दर वाढले असून 38 हजारांवर पोहोचले आहेत. 

हल्ली साडेतीन मुहूर्तांना सोने खरेदी करण्याकडे सगळ्यांचाच कल जास्त आहे. या दिवशी कोणतंही शुभकार्य केलं जातं त्यासाठी खास मुहूर्त पाहण्याची गरज लागत नाही. या शुभ मुहूर्तावर सोन्याचं वळं किंवा क्वाईन खरेदी करून ठेवला जातो. खरेदी करताना हॉलमार्कचे दागिने, त्याचे स्टॅम्प आणि पक्क बिल घेणं महत्वाचं असतं. 

सोमवारी दिल्ली सराफांमध्ये सोने 120 रुपयांनी वाढले असून 39,270 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. तर चांदी 240 रुपयांनी कमी झाली असून आता 46,510 रुपये किलो आहे. सोन्यातील वाढ इतकी आहे की, हा दर 39,220 रुपयांवरून 39,390 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. सफेद धातूची मागणी कमी झाल्यामुळे चांदीच्या दरात 240 रुपयांनी कपात झाली आहे. आता चांदीचा दर 46,510 रुपये इतका आहे. चांदीचा दर यापेक्षा खाली गेला असून 45,390 रुपये प्रति किलो आहे.