कोरोना काळात लिंबू आणि नारळ पाण्याच्या किंमती का वाढल्या? काय आहे खरं कारण

कोरोनावरती पूर्णपणे मात करण्यासाठी अजुनपर्यंत शास्त्रज्ञ आणि डॅाक्टर प्रयत्न करत आहेत

Updated: Apr 26, 2021, 04:37 PM IST
कोरोना काळात लिंबू आणि नारळ पाण्याच्या किंमती का वाढल्या? काय आहे खरं कारण title=

मुंबई : कोरोनावरती पूर्णपणे मात करण्यासाठी अजुनपर्यंत शास्त्रज्ञ आणि डॅाक्टर प्रयत्न करत आहेत. त्यातचं लोकं आपआपल्या परिने यापासून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असतात. कोणी गरम पाणी पिऊन, तर कोणी शरिराला पूरक आणि चांगले विटामीन्स आणि लोह देणाऱ्या गोष्टी खाऊन आपले शरिर फिट ठेवण्याचा प्रयत्न करतात. जसे फळं, हिरव्या भाज्या, फळभाज्या असे पदार्थ आपल्या रोजच्या खाण्यात आणतात.

जेणेकरुन आपल्या शरिरातील रोग प्रतिकारशक्ती वाढेल. परंतु या गोष्टींचे किंमती खूप वाढल्या आहेत. परिस्थिती अशी आहे की, नारळपाणी किंवा नारळाची किंमत दिल्लीमध्ये 90 ते 120 रुपये आहे. तर भाज्या 60 ते 80 रुपये किलो झाल्या आहेत. 1 किंवा 2 रुपयांना मिळणार लिंबू आता 15 रुपयांचा झाला आहे.

नारळ पाण्याच्या किंमती अचानक का वाढल्या?

दिल्लमध्ये नारळाच्या पाण्याची विक्री करणारे धर्मेंद्र म्हणतात की,  गेल्या काही दिवसांपासून नारळ पाण्याची किंमत गगनाला भिडली आहे. मंडईमध्ये काही दिवसांपूर्वी नारळ पाण्याची किंमत सामान्य होती. परंतु आता तेथे किंमत वाढली आहे, म्हणून त्यांनाही जास्त किंमतीत नारळ पाणी विकावा लागत आहे. यामध्ये छोट्या आकाराच्या नारळाची किंमत 90 रुपये आहेत, तर मोठ्या आकाराच्या नारळाची किंमत 110 रुपये आहे.

लिंबू ही महाग

1 ते 2 रुपयांत मिळणारा लिंबू देखील किंमतीच्या बाबतीत मागे नाही. उन्हाळा सुरू होताच लिंबूची किंमत तशी थोडी महाग होते. परंतु आता तर ते वाजवीपेक्षा जास्तच महाग झाले आहेत. दिल्ली एनसीआरमध्ये एका लिंबूची किंमत 10 रुपयांपेक्षा कमी नाही. तर बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये एक लिंबू 15 रुपयांना विकला जात आहे. दिल्लीत भाजीपाला विकणारे विजय कुमार म्हणतात की, दिल्ली बाजारात लिंबू दक्षिण भारतातून पुरविला जातो. तेथून कमी लिंबूंचा पुरवठा होत असल्याने आवक कमी झाली आहे आणि त्यामुळे येथे किंमत जास्त वाढली आहे.

10 दिवसांपूर्वी 20 ते 25 रुपयांत विकल्या गेलेल्या किवी फळाची किंमत 50 रुपये झाली आहे. परदेशी ड्रॅगन फळांच्या किंमतीही दुप्पट झाल्या आहेत. पूर्वी ड्रॅगन फळ 60 ते 70 रुपयांत विकले जात होते, परंतु आता त्याची किंमत 120 रुपयांवर गेली आहे.

रोग प्रतिकारशक्ती वाढविणार्‍या गोष्टींच्या किंमतीत वाढ

कोरोना संक्रमनापासून वाचण्यासाठी विटामीन 'सी' प्रभावी आहे आणि आंबट फळांमध्ये विटामीन 'सी' असते. लिंबूमधून देखील आपल्याला विटामीन 'सी' मिळते. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होते. याचंमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढविण्याऱ्या भाज्या किंवा फळांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.