पावसाळ्याच्या दिवसात सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी खास उपाय

मुख्य म्हणजे सर्पदंश झाल्यावर वेळीच उपचार केल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो.

Updated: Jul 3, 2022, 12:39 PM IST
पावसाळ्याच्या दिवसात सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी खास उपाय title=

मुंबई : लहान मुलं असो किंवा वयस्कर व्यक्ती असे बहुतांश लोकं साप या केवळ शब्दालाच घाबरतात. सापाच्या दंशाने नव्हे तर साप चावल्याच्या भीतीनेच काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहे. मुख्य म्हणजे सर्पदंश झाल्यावर वेळीच उपचार केल्यास व्यक्तीचा जीव वाचू शकतो. आता पावसाळा जवळ आला आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांत साप सर्वाधिक प्रमाणात दिसून येतात.

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सापांच्या बिळात पाणी शिरत असल्याने साप बिळाबाहेर येतात. बिळाबाहेर आल्यानंतर हे साप घरातही घुसतात. पावसाळ्यात सापाला घरापासून दूर ठेवण्यासाठी काही उपाय आम्ही सांगणार आहोत.

सापाला घरापासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही घरात कार्बोनिक अॅसिड आणि फिनाईल घरामध्ये शिंपडू शकता. साप यो दोन्ही प्रकारच्या अॅसिडला घाबरतात आणि घरामध्ये येत नाहीत.

साप घरात येऊ नये म्हणून तुम्ही अजून एका मार्गाचा अवलंब करू शकता. यात तुम्ही अमोनियामध्ये कापडाचे तुकडे भिजवून ज्या ठिकाणाहून साप घरात प्रवेश करतो तिथे ठेवा. घरात पूर्वी कधी साप पाहिला असेल अशा ठिकाणीही तुम्ही हा कपडा ठेऊ शकता.

सापाला दूर ठेवण्यासाठी केरोसिनचाही वापर केला जातो. रॉकेलमध्ये कापड भिजवून ते कापड घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा. तसंच घराच्या आजूबाजूला देखील तुम्ही रॉकेल शिंपडू शकता. रॉकेलचा वास सापांना सहन होत नसल्याने ते घरामध्ये येणार नाहीत.