Petrol Price : सलग सातव्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ

जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर   

Updated: Feb 15, 2021, 08:54 AM IST
Petrol Price : सलग सातव्या दिवशी पेट्रोलच्या दरात वाढ title=

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरात सतत वाढ होत आहे. सलग सातव्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 89 रूपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे आता वाहन चालकांच्या खिश्याला कात्री बसणार आहे. डिझेल देखील 79 रूपयांवर पोहोचला आहे. दिल्लीत जुलै महिन्यात डिझेलच्या दराने उच्चांक गाठला होता. तेव्हा डिझेल 81.94 रूपये प्रति लिटर असून पेट्रोलसाठी 80.43 रूपये मोजावे लागत होते. मात्र आता पेट्रोल-डिझेलचे दर शंभरच्या उंबरठ्यावर आहेत. 

कोरोना विषाणूच्या साथीनंतर आता जगातील आर्थिक परिस्थितीतही सुधारणा दिसून येत असून, सर्वच वस्तूंच्या मागणीतही सुधारणा झाली आहे. त्याचप्रामाणे इंधनांची मागणी देखील वाढली आहे. ब्रेंट क्रूड 1.29 डॉलरने वाढून 62.43 डॉलर प्रति बॅरलवर आला आहे.

दुसरीकडे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून ड्युटीमध्ये कोणतीही सवलत न मिळाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. परिणामी पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठू शकतात अशी शक्यता नाकारता येत नाही. 

जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोलचे दर 

शहर         कालचे दर          आजचे दर
दिल्ली         88.73             88.99
मुंबई          95.21             95.46
कोलकाता      90.01             90.25
चेन्नई         90.96             91.19

4 मेट्रो शहरांमधील डिझोलचे दर

शहर                कालचा दर      आजचा दर
दिल्ली              79.06              79.35
मुंबई               86.04              86.34
कोलकाता          82.65              82.94
चेन्नई              84.16              84.44