गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना मिळाले सर्वाधिक मतं?

राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना विजय मिळालाय. पण, गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना सर्वाधिक मतं मिळालीत याची माहिती तुम्हाला आहे का?

Updated: Jul 21, 2017, 12:21 PM IST
गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना मिळाले सर्वाधिक मतं? title=

नवी दिल्ली : राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना विजय मिळालाय. पण, गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना सर्वाधिक मतं मिळालीत याची माहिती तुम्हाला आहे का?

कोविंद यांना राष्ट्रपती निवडणुकीत एकूण १०,९०,३०० मतांमधून ७,०२,०४४ मतं मिळालीत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवारी मीरा कुमार यांना ३,६७,३१४ मतं मिळाली. या हिशोबानं कोविंद यांना ६५.६५ टक्के मतं प्राप्त झालीत.

राष्ट्रपती निवडणुकीत केवळ १९७७ असं वर्ष होतं, ज्यावर्षी नीलम संजीव रेड्डी यांची सर्वोच्च पदावर बिनविरोध निवड झाली होती. गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना सर्वाधिक मतं मिळाली जाणून घेऊयात...

- ज्ञानी झैल सिंह (१९८२) - ७२.७३ टक्के

- आर. वेंकटरमण (१९८७) - ७२.२८ टक्के

- शंकर द्याल शर्मा (१९९२) - ६५.८७ टक्के

- के आर नारायणन (१९९७) - ९४.९७ टक्के

- ए पी जे अब्दुल कलाम (२००२) - ८९.५७ टक्के

- प्रतिभा पाटील (२००७) - ६५.८२ टक्के

- प्रणव मुखर्जी (२०१२) ६९.३१ टक्के

नारायणन यांच्याशिवाय केवळ दोन माजी राष्ट्रपतींना म्हणजेच डॉ. राजेंद्र प्रसाद आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना ९० टक्क्यांहून अधिक मतं मिळाली होती. प्रसाद यांना १९५७ मध्ये ९८.९९ टक्के आणि सर्वपल्ली राधाकृष्णन यांना १९६२ मध्ये ९८.२४ टक्के मतं मिळाली होती.