मोदींच्या 'मन की बात'मधून ऑल इंडिया रेडिओची बक्कळ कमाई!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'मन की बात' हा कार्यक्रम खूप ऑल इंडिया रेडिओसाठी चांगलाच फायदेशीर ठरलाय.

Updated: Jul 21, 2017, 01:49 PM IST
मोदींच्या 'मन की बात'मधून ऑल इंडिया रेडिओची बक्कळ कमाई!  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'मन की बात' हा कार्यक्रम खूप ऑल इंडिया रेडिओसाठी चांगलाच फायदेशीर ठरलाय. या कार्यक्रमाने ऑल इंडिया रेडियोला १० कोटींची कमाई करून दिलीय.

माहिती आणि प्रसारणाची राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिलीय.  'मन की बात'  या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी दररोजच्या सामाजिक समस्येवर लोकांशी बोलतात.

महसूलीत वाढ

या कार्यक्रमामुळे महसूलीत वाढ होत असल्याचं सरकारच्या आकडेवारीतून दिसून येतंय. २०१६-२०१७ च्या कार्यक्रमात रेडिओनं ५.१९ कोटी, २०१५-२०१६ मध्ये ४.७८ कोटी कमावलेत, असं राठोड यांनी सांगितलंय.

परदेशातही लोकप्रिय...

 'मन की बात'  हा कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी १८ प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित केला जातो. हा कार्यक्रम आता इंग्रजी आणि संस्कृतमध्ये प्रसारित केले जाणार आहे. तसेच इंटरनेट आणि शॉर्ट वेब ट्रान्समीटरच्या माध्यमातून हा कार्यक्रम परदेशातही पोहचत आहे आणि लोकप्रियही होत आहे, असं केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलंय.