शिवाजी महाराज सिस्टम बिल्डर होते - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

शिवजयंती निमित्त तुम्ही सर्वांना शुभेच्छा, शिवाजी महाराजांची कलाकृती मला भेट देण्यात आली, राष्ट्रपती भवनात शिवाजी राजेंच्या कलाकृतीची कमतरता जाणवत होती, असे देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. ते दिल्लीत झालेल्या शिवजयंतीच्या शानदार सोहळ्यात बोलत होते. 

Updated: Feb 19, 2018, 07:59 PM IST
शिवाजी महाराज सिस्टम बिल्डर होते - राष्ट्रपती रामनाथ कोविंद title=

नवी दिल्ली : शिवजयंती निमित्त तुम्ही सर्वांना शुभेच्छा, शिवाजी महाराजांची कलाकृती मला भेट देण्यात आली, राष्ट्रपती भवनात शिवाजी राजेंच्या कलाकृतीची कमतरता जाणवत होती, असे देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. ते दिल्लीत झालेल्या शिवजयंतीच्या शानदार सोहळ्यात बोलत होते. 

युद्धनीतीचा अभ्यास सुरूच आहे

रायगड येथे होणारा शिवराज्यभिषेक लोकप्रिय झाला आहे. शिवाजी राजांनी न्याय प्रती आदर्श निर्माण केला. लोकांमध्ये आत्मसन्मान जागृत केला. शिवाजी महाराजांमध्ये अनेक गुण होते. या गुणांचे आश्चर्य वाटते. त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास सुरूच आहे. गुरिल्ला नीतीचा शिवाजी महाराजांनी वापर केला. 

महाराज कुशल राज्यन्यायिक

शिवाजी महाराज सिस्टम बिल्डर होते. ते कुशल राज्यन्यायिक होते. त्यांनी कमी वेळेत अनेक गड बांधले. जातपात न मानता योग्यतेच्या आधारावर लोकांची निवड केली. लोकसाहीत्यात शिवाजी महारांजांना विशेष स्थान आहे. महिलांचा सन्मान करणे हा आदर्श शिवाजी महारांजांनी घालून दिला.