नवी दिल्ली : उद्या देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अधिवेशनाला सुरूवात झाली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून मोदी सरकारच्या कामाचा पाढा वाचण्यात आला. यावेळी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या कामास सुरूवात झाली. मोदी सरकारच्या कार्यकाळातील हे शेवटचे अधिवेशन आहे. गेल्या साडे चार वर्षात कोणत्या योजना जनते पर्यंत नेल्या हे सांगण्याची एकही संधी मोदी सरकार सोडत नाही. याचाच प्रत्यय आज सदनात आला. राष्ट्रपतींच्या भाषणातून मोदी सरकारच्या कामाचा संपूर्ण आढावा देशाला ऐकायला मिळाला. यावेळी तरुण, शिक्षण, आरोग्य, आवास अशा वेगवेगळ्या क्षेत्रात मोदी सरकारने दिलेल्या योगदानाचा राष्ट्रपतींना आपल्या भाषणात उल्लेख केला. सरकारने देशवासियांचा विश्वास संपादन केला असून राज्यघटनेनुसार सरकारचं कामकाज झाल्याचे राष्ट्रपती कोविंद यांनी यावेळी सांगितले. लोकसभा निवडणूका तोंडावर असल्याने या घटनेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
President Ram Nath Kovind: Citizenship Amendment Bill will make it easier to provide Indian citizenship to those who had to take refuge in India after facing oppression somewhere else. They were not at fault, they were victims of situations like that. pic.twitter.com/zX0IKJVuOu
— ANI (@ANI) January 31, 2019
President Ram Nath Kovind: Healthcare is my government’s topmost priority. I am happy to inform you that the benefits of government’s schemes are reaching poorest of the poor. pic.twitter.com/N6LvFsNlq4
— ANI (@ANI) January 31, 2019
सरकार शोषणाविरोधात लढत आहे.देशभरात शौचालय बांधल्याने रोग निर्मुलन झाले आहे. 4 वर्षात 13 कोटी लोकांना गॅस कनेक्शन देण्यात आले. मोदी सरकारच्या कार्यकाळात 3,100 कोटी रुपयांचा निधी जमा झाला. नैसर्गिक संकटांशी लढा देण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली.
President Ram Nath Kovind: We know that expenses on health makes a poor even poorer. My govt understood this & started Ayushman Bharat Yojana. In last 4 months more than 10 Lakh poor people availed health benefits in hospitals under this scheme. pic.twitter.com/IJVqFnRE0j
— ANI (@ANI) January 31, 2019
दिव्यांगांसाठी सरकारने मोठा काम केले. दिव्यांगांसाठी 3 हजार शब्दांचा शब्दकोश तयार केला. त्यांच्यासाठी सांकेतिक भाषेवर काम सुरू केले आहे. सरकारच्या 100 वेबसाईट दिव्यांगांसाठी अनुकूल आहेत.
केवळ १ रुपया महिन्याच्या महिना प्रिमियमवर 'पंतप्रधान सुरक्षा विमा योजना' आणि ९० पैसे प्रतिदिनच्या प्रिमियमवर 'पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना' यास्वरुपात जवळपास २१ करोड गरीब जनतेला विमा सुरक्षा उपलब्ध करून दिले.
गेल्या साडे चार वर्षांत सरकारच्या ग्रामीण आवास योजनेंतर्गत १ करोड ३० लाखांहून अधिक घरं उभारली गेली. याउलट २०१४ पूर्वी पाच वर्षांत केवल २५ लाख घरे उभारली गेली होती.
President Kovind: Under Jan Dhan Yojana, 34 crore people have opened a bank account & almost every family in the country is connected to the banking system. According to an international agency, 55% of the total bank accounts opened between 2014-2017 were opened in India itself. pic.twitter.com/Zdp3fcRIBH
— ANI (@ANI) January 31, 2019
महागाई दर खाली आणल्यानं मध्यमवर्गीय कुटुंबाना मोठा दिलासा मिळाला
आयकराचं ओझं कमी करत आणि महागाईवर नियंत्रण मिळवत सरकारनं मध्यम वर्गाला बचतीच्या संधी दिल्या
मेहनत करणाऱ्या आपल्या मध्यम वर्गाची मिळकत आणि बचत वाढवण्याचे सरकारनं प्रयत्न केले
पंतप्रधान आवास योजनेला गती मिळाली. या योजनेंतर्गत १.३० करोड लोकांना घरांची चावी सोपवण्यात आली.
दिव्यांगासाठी अटल बिहारी वाजपेयी सरकारनं मोठं काम केले. दिव्यांगांसाठी ७०० कोटींची सहाय्यता उपकरणं देण्यात आली.
कुपोषणाविरुद्ध राष्ट्रीय मिशनची सुरुवात करण्यात आली.
देशातल्या प्रत्येक घरापर्यंत वीज पोहचली, २ कोटी ४७ लाख घरांपर्यंत वीज पोहचवण्याचं काम केले.
माझ्या सरकारने २१ करोड भारतीयांपर्यंत जीवन ज्योती योजनेचा लाभ पोहचवण्याचं काम केले. गरिबांपर्यंत योजना पोहचवण्याचा सरकारचा संकल्प. गोरगरिबांसाठी आरोग्याच्या योजना