वारंवार निवडणुकांमुळे देशाच्या विकासावर परिणाम- राष्ट्रपती

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातील आज दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 29, 2018, 06:57 PM IST

नवी दिल्ली : देशात वारंवार होणाऱ्या निवडणुकांमुळे विकासावर विपरित परिणाम होत असल्याचं प्रतिपादन आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केलं. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातील आज दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपतींचं अभिभाषण झालं. त्यावेळी राष्ट्रपती बोलत होते. 

देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची गरज - राष्ट्रपती

भाषणात मोदी सरकारनं केलेल्या कामांची यादी वाचून दाखवली. त्याचप्रमाणे येत्याकाळात देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याची गरज असल्याचंही बोलून दाखवलं. सरकारनं या दृष्टीनं समाजाच्या विविध घटकांसोबत चर्चा करावी,त्याप्रमाणे सर्वपक्षीयांमध्येही सहमती निर्माण करावी असं कोविंद यांनी म्हटलंय.

2018 शेवटी लोकसभेची निवडणूक घेतली जाण्याची शक्यता

2018 शेवटी  मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडच्या निवडणूक होतेय. त्यासोबतच लोकसभेची निवडणूक घेतली जाईल अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगतेय. आज राष्ट्रपतींनीही  एकत्र निवडणूकीचे संकेत दिले आहेत.