प्रेमकुमार धूमल भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, अमित शाहांची घोषणा

भारतीय जनता पक्षाने अखेर हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्रीपदासाठी प्रेमकुमार धूमल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. धूमल हे दोनदा हिमाचलचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Oct 31, 2017, 06:45 PM IST
प्रेमकुमार धूमल भाजपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार, अमित शाहांची घोषणा title=

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने अखेर हिमाचल विधानसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मुख्यमंत्रीपदासाठी प्रेमकुमार धूमल यांची उमेदवारी जाहीर केली आहे. धूमल हे दोनदा हिमाचलचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी दावा केला होता की, हिमाचलमध्ये पक्षाच्यावतीने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्यात येणार नाही. ही पक्षाची रणनितीचा भाग आहे. ही रणनिती राज्या राज्यानुसार बदलत राहते.

 ७३ वर्षीय प्रेम कुमार धूमल हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. १९८४मध्ये धूमल यांनी लोकसभेची पहिली लोकसभा निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. १९८९च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी हमीरपूर मतदारसंघातून विजय मिळवला. १९९१मध्ये धूमल पुन्हा पुन्हा हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेत. त्यानंतर भाजपने त्यांना हिमाचल प्रदेश राज्यचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले. 

१९९६ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. भाजप-हिमाचल विकास कॉंग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमध्ये प्रथमच त्यांना राज्य प्रभारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मार्च१९९८ ते मार्च २००३पर्यंत ते राज्यचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर ते डिसेंबर २००७ ते डिसेंबर २०१२ या काळात मुख्यमंत्री होते. धूमल सुजानपूर मतदारसंघातून यावेळी आपले नशिब अजमावत आहेत