आता तुमच्या चेहऱ्याचा आकार सांगणार की, तुम्ही किती लकी आहात!

याबाबत एक संशोधन करण्यात आलं असून, यामध्ये रंजक गोष्टी समोर आल्या आहेत.

Updated: May 8, 2022, 02:55 PM IST
आता तुमच्या चेहऱ्याचा आकार सांगणार की, तुम्ही किती लकी आहात! title=

मुंबई : असं म्हणतात की एखाद्या व्यक्तीचा चेहरा पाहून त्या व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगता येऊ शकतात. पण मग नशीबाचं काय? पण, तुम्हाला माहिती आहे का? एखाद्याचा चेहरा वाचून तुम्हाला त्याच्या नशिबंही कळू शकतं? याबाबत एक संशोधन करण्यात आलं असून, यामध्ये रंजक गोष्टी समोर आल्या आहेत.

न्यू साउथ वेल्स युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी, पुरुष आणि महिलांच्या 17,607 पासपोर्ट फोटोंच्या चेहऱ्याची रुंदी-लांबी मोजली. यानंतर त्यांनी केलेल्या अभ्यासातून निष्पन्न झालेल्या परिणामांवरून असं दिसून आले की, चौकोनी चेहऱ्याचा आकार असणारे लोक अंडाकृती चेहरा असणाऱ्या व्यक्तींपेक्षा जास्त रागीट आणि आक्रमक असतात. ही गोष्ट पुरुषांमध्ये अधिक आढळून आली. याशिवाय चेहऱ्याच्या इतर आकारांबाबतही अनेक गोष्टी समोर आल्या.

ज्या लोकांचा चेहरा चौकोनी (चौरस) असतो ते खूप चपळ आणि महत्वाकांक्षी असतात. या व्यक्ती आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. अशावेळी ते बंडखोर रूप देखील धारण करू शकतात. 

तर ज्या लोकांचा चेहरा त्रिकोणी असतो, ते खूप सर्जनशील असतात. या व्यक्ती बुद्धिमान असून त्यांना लवकर राग येऊ शकतो. त्रिकोणी चेहरे असलेले लोक सहसा दुबळे असतात, असंही या संशोधनातून समोर आलं आहे.

ज्या लोकांचा चेहरा अंडाकृती असतो ते कलात्मक प्रवृत्तीचे असतात. या लोकांचं व्यक्तिमत्व खूप आकर्षक असतं शिवाय ते लोकांमध्ये स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करतात. पण हे लोकं आरोग्याच्या दृष्टीने कमकुवत असतात आणि लवकर आजारी पडतात. 

या अभ्यासातून गोल चेहऱ्याचे लोक खूप भावूक असतात आणि ते ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यासाठी सर्वकाही करण्यास तयार असतात, असं समोर आलं आहे. तसंच गोलाकार चेहरा सौंदर्याच्या बाबतीतही सर्वात सुंदर मानला जातो.