नवी दिल्ली: प्रयागराजयेथे शनिवारी सकाळी कुंभमेळाव्या दरम्यान एक होडी उलटल्याची घटना घडली आहे. संगमयेथे जाणाऱ्या होडीत ९ भक्त होते. घटना स्थळी तात्काळ एनडीआरएफची टीम दाखल झाली. सुदैवाने घडलेल्या अपघातात जिवितहानी झलेली नही. एनडीआरएफच्या आधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे अपघात झाल्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन द्वारे सर्व भक्तांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावेळी कुंभमेळाव्याचे आयोजन भव्य स्वरुपाचे असल्याचा दावा केला होता. त्यासाठी योगी सरकारने मोठी रक्कम मोजली आहे. त्याचप्रमाणे सुरक्षा व्यवस्थेचाही चोख बंदोबंस्त करण्यात आला असल्याचे घोषित केले होते.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच कुंभमेळाव्यात तीन दुर्घटना घडल्या आहेत. या अपघातांमध्ये विशेष नुकसान झाले नसले तरीही मात्र व्यवस्था प्रणालींमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत.
कुंभमेळाव्या दरम्याणची पहिली घटना म्हणजे, १४ जानेवारी रोजी दिगंबर आखाच्या छावणीत सिलेंडरच्या स्फोटामुळे आग लागली होती त्यमुळे कुंभ मेळ्यातील अनेक मंडळे जळून राख झालीत. झालेल्या या घटनेत जिवितहानी झाली नसली तरी भक्तांचे आर्थिक नुकसान झाले.
१६ जानेवारी रोजी वासुदेवनंद शिबिरात आग लागली. त्याचवेळेस शिबीरात भंडारा सुरु होता. त्यानंतर १९ जानेवरी रोजी सेक्टर-१३ मधील मंडळाला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली होती, घटना स्थळी अग्निशामन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या होत्या.